जगात पैशाने सर्व काही मिळेल मात्र, आईचे प्रेम मिळणार नाही – ह. भ. प. अमोल सुळ महाराज.

माळशिरस ( बारामती झटका )

आई आपल्यावर निस्वार्थी प्रेम करते. कोणत्याही लोभाचा विचार न करता, आई प्रेम करत असते. जगात सर्व काही विकत मिळेल मात्र, आईचे प्रेम मिळणार नाही, असे ह.भ.प. अमोल सुळ महाराज मोरोची यांनी गोरडवाडी येथे स्वर्गीय सजाबाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनामध्ये उपस्थित श्रोत्यांना कीर्तनामध्ये सांगितले आहे.

गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील मल्हारी कर्णवर पाटील यांच्या धर्मपत्नी सजाबाई यांचे चार वर्षापूर्वी दुःखद निधन झालेले होते. कर्णवर परिवार यांनी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्यावेळी पुष्पवृष्टी व महाप्रसादाच्या कार्यक्रमावेळी ह.भ.प. अमोल सुळ महाराज यांचे सुश्राव्य किर्तनाचे आयोजन केले होते.
ह.भ.प. अमोल सुळ महाराज यांनी प्रस्तुत सेवेसाठी “मातेचीये चित्ती, अवघे बाळकाची व्याप्ती !!१!! देह विसरे आपला, जवळीं घेता शिण गेला !! धृ !! दावी प्रेमभाते, आणि अंगावरी चढतें !!२!! तुका संतापुढे, पायी झोंबे लाडे कोडें !!३!! या अभंगावरती अतिशय प्रभावशाली व समाज प्रबोधन पर किर्तन केले. आई-वडिलांची सेवा करा. आई वडील आपले दैवत आहेत. जगामध्ये आपली आईच फक्त आपली किंमत करते. मुलगा कसाही असला तरी आईला प्रिय असतो. आई आपल्या मुलांची सतत काळजी करते. स्वतःची कमी मात्र, परिवाराची जास्त काळजी करीत असते. प्रतिकूल परिस्थितीत संसार उभा करण्याकरता स्त्रिया महत्त्वाच्या असतात.

अशा कर्णवर पाटील परिवारामध्ये सजाबाई यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांनी केलेले कार्य समाजाला आदर्शवत आहे. त्यांचा वसा आणि वारसा भागवत, शशिकांत, गोविंद चालवत आहेत. त्यांच्या पश्चात एकत्र कुटुंब पद्धती हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरत आहे. असे अनेक दृष्टांत देऊन ह.भ.प. सुळ महाराज यांनी ओठावर हसु आणि डोळ्यामध्ये अश्रू आणलेले होते. यावेळी सदरच्या कीर्तनामध्ये गायनाचार्य अशोक मोहिते, भीमराव गोरड, माऊली दनाने, दशरथ गोरड, शिंदे महाराज यांनी काम केले. तर मृदंगाचार्य अनिकेत शिंदे, भीमराव कर्णवर व हार्मोनियम वादक नाना पिंगळे यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर टाळकरी आणि विणेकरी यांनीही मोलाची साथ दिली. किर्तनरुपी सेवेला पूर्णविराम देऊन पुष्पवृष्टी करून आरती झाल्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

स्व.सजाबाई कर्णवर पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सकाळपासून रक्तदानाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व लोकांचे स्वागत व आदरातिथ्य कर्णवर पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात येत होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलक्ष्मणाची गोरडवाडीतील बिरोबाची मागणी रामाने पूर्ण केली…
Next articleझिंजेवस्ती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी ग्रामीण विकास आघाडीच्या मैनाताई अंकुश मदने यांची बिनविरोध निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here