जनावरांना लाळ्या खुरकतीचा संसर्ग होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने लस उपलब्ध करावी…

शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या विमा पॉलिसी कंपन्यांना स्वाभिमानी स्टाईलने धडा शिकविणार – अजित बोरकर

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यात सध्या जनावरांना लाळ्या खुरकतीच्या साथीचा रोग आला आहे. या रोगांची लागण अतिशय झपाट्याने वाढून जनावरे मृत्युमुखी पावत आहेत. म्हणून माळशिरस तालुक्यातील जनावरांमध्ये वाढत्या रोगाची लागण पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तातडीने माळशिरस तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाने तातडीने लस उपलब्ध करावी.
माळशिरस तालुक्यात जवळपास २,२५,००० ते २,५०,००० जनावरे आहेत. सर्वसाधारणपणे लाळ्या खुरकतीचा रोग खुर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो. याचा गंभीर परिणाम जनावरांवर होतो. त्यामध्ये जनावरांचे खाणे पिणे सर्व बंद होते, जनावरांना ताप येतो तसेच जनावरांच्या जिभेवर व टाळ्यावर तोंडाच्या आतील भागात फोड येतात, जनावरांच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. तसेच पुढील पायामध्ये खुरातील बेचकीमध्ये फोड येतात व जनावरांना मागील पायात फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. यामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता असते. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय शेतकरी वर्ग करीत असतो. या शेतकरी वर्गाची नुकसान होऊ नये म्हणून तातडीने साथीच्या रोगांवर उपाय म्हणून प्रतिबंधात्मक योजना करणे आवश्यक आहे. तरी माळशिरस तालुक्यातील जनावरांना लाळ्या खुरकतीच्या साथीची लस तातडीने पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध करून तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी माळशिरस तालुक्यातील शेतकरी वर्गामधून होत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेकडून किंवा खाजगी विमा पॉलिसी कंपनीकडून जनावरांची विमा संरक्षण पॉलिसी आहे. परंतु, काही विमा पॉलिसी या कंपन्या शेतकऱ्यांना वेळेवर विमा पॉलिसीचा लाभ देत नाहीत. शेतकऱ्यांना वेठीस धरले जातेय व शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जातोय. अशा कंपनीतील अधिकाऱ्यांना स्वाभिमानी स्टाईलने धडा शिकवला जाईल – अजित बोरकर, तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुण्यात दोन खत विक्रेत्याचे विक्री परवाने निलंबित, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांची कारवाई
Next articleमाळेगाव येथे खजूर लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here