जयसिंह मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील समर्थक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमने-सामने.

येळीव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 12 जागातील 2 बिनविरोध तर, 10 जागांसाठी दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत.

माळशिरस ( बारामती झटका )

येळीव विकास सेवा सोसायटी मर्यादित येळीव ता. माळशिरस या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झालेली आहे. 12 जागा संचालकाच्या असणाऱ्या पैकी दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. दहा जागांसाठी दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत लागलेली आहे. माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह शंकरराव मोहिते पाटील आणि माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जनसिंह मदनसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमने-सामने आलेले असल्‍याची चर्चा येळीव परिसरात रंगलेली आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढलेली आहे.

येळीव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये श्री काळा मारुती सोसायटी बचाव पॅनल विलास फरतडे, गुलाबराव निंबाळकर, विलासराव निंबाळकर, मोहन निंबाळकर सर, उद्धव निंबाळकर, दादा मुरलीधर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात निंबाळकर बापू बळी, निंबाळकर दशरथ भोजू, निंबाळकर लक्ष्मण नामदेव, निंबाळकर राजाराम लक्ष्मण, निंबाळकर शिवाजी भीमराव, फरतडे हरिदास नारायण, रोकडे गुलाब आप्पा असे उमेदवार उभे आहेत. महिला प्रतिनिधी गटात, देशमुख सुनंदादेवी यशवंत, निंबाळकर नागरबाई नारायण अशा महिला उभ्या आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात मोहिते धनाजी राऊ उभे आहेत. सर्व उमेदवारांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.

सहकार महर्षी विकास पॅनल ज्ञानदेव सोनबा निंबाळकर, पोपट मारुती निंबाळकर, ज्ञानदेव बजरंग निंबाळकर, विक्रम फरतडे, संतोष कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली खातेदार कर्जदार गटामध्ये देशमुख अरविंद छंदार, निंबाळकर आबासो रस्तुम, निंबाळकर धनंजय जयसिंग, निंबाळकर तानाजी शंकर, निंबाळकर तुकाराम कृष्णा, शिर्के गोरख सोपान, शिर्के कैलास नामदेव, असे उमेदवार उभे आहेत. महिला प्रतिनिधी गटात निंबाळकर पार्वती महादेव, निंबाळकर शालन बाळासो, अशा महिला उभ्या आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात मोहिते बापू निवृत्ती उमेदवार उभे आहेत. सर्व उमेदवारांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.

राजाराम लक्ष्मण सरगर व दत्तात्रय दामोदर कुदळे दोन उमेदवार दोन्ही पॅनलचे बिनविरोध झालेले आहेत. उर्वरित 10 जागांसाठी 20 उमेदवार समोरासमोर लढत होऊन आपले नशीब आजमावत आहेत. सोसायटीचे 279 मतदार सभासद आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक सभासद मयत झालेले आहेत. 197 सभासद मतदान करणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. गोरे काम पाहत आहेत. त्यांना सोसायटीचे सचिव मदत करीत आहेत.

माळशिरस तालुक्यात बहुतांश विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार सुरू असतो. बऱ्यापैकी जयसिंह मोहिते पाटील यांचे कमांड सोसायट्यांवर आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्याकडे पंचायत समितीची जबाबदारी आल्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये अर्जुनसिंह मोहिते पाटील समर्थक वेगळा गट निर्माण झालेला आहे, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

अशी चर्चा सुरू असताना येळीवमध्ये सोसायटीच्या निवडणुकीत चित्र स्पष्ट झालेले आहे. जयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत काम करणारे श्री काळा मारुती सोसायटी बचाव पॅनलच्या पाठीमागे असणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज यावरून बाळदादा यांच्या समर्थकांचे पॅनल असल्याचे पहावयास मिळत आहे. तर सहकार महर्षी विकास पॅनल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेले कार्यकर्ते आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत असणारे समर्थक कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा आहे, असे अनेक अर्जुनसिंह मोहिते पाटील समर्थक या पॅनलच्या पाठीशी आहेत. त्यामुळे सध्या तरी बाळदादा आणि अर्जुनदादा समर्थक एकमेकांच्या समोरासमोर आलेले आहेत. अशी चर्चा पंचक्रोशीमध्ये रंगलेली आहे.

येळीव गावामध्ये मोहिते पाटील विरोधक गट व काँग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचाही एक गट आहे. प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवार मतदारांना प्रचारामध्ये मतदान मागत असताना बऱ्याचशा भूमिका स्पष्ट होणार आहेत. त्यावेळेस खऱ्या अर्थाने गटातटाचे राजकारण समोर येणार आहे. सध्या तरी बाळदादा आणि अर्जुनदादा यांच्या समर्थकांची चर्चा सुरू आहे. भविष्यात मोहिते पाटील यांच्या समर्थकामध्ये गटतट पडल्यास भविष्यातील राजकीय निवडणुकीत वेगळे चित्र पहावयास मिळेल, अशी तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडाळिंब दशा आणि दिशा भाग- ३ सतीश कचरे ‘मंडळ कृषि अधिकारी नातेपुते.
Next articleगिरवी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी धुळा शंकर खरात यांचा दैदिप्यमान विजय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here