श्री काळा मारुती सोसायटी बचाव पॅनलचा दणदणीत विजय, विरोधी गटाचा धुरळा उडाला.
येळीव ( बारामती झटका )
येळीव विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचे विकास सेवा सोसायटीवर वर्चस्व आहे. श्री काळा मारुती सोसायटी बचाव पॅनलचा दैदिप्यमान दणदणीत विजय झालेला आहे तर विरोधी गटाचा धुरळा उडालेला आहे.
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांची येळीव येथील सोसायटीच्या निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार व नवनिर्वाचित विजयी उमेदवार यांनी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला. जयसिंह मोहिते पाटील यांनी नेते व विजयी उमेदवार यांचे अभिनंदन केले. यावेळी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विलास फडतरे, माजी सरपंच विलास निंबाळकर, सतीश फरतडे, बलभीम निंबाळकर, दादा निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर, पिंटू निंबाळकर, पोपट निंबाळकर, महेश मोहिते, बापू बळी निंबाळकर, दशरथ भोजू निंबाळकर, लक्ष्मण नामदेव निंबाळकर, राजाराम लक्ष्मण निंबाळकर, शिवाजी भिमराव निंबाळकर, दत्तात्रय फडतरे, गुलाब आप्पा रोकडे, धनाजी भाऊ मोहिते, मल्हारी शिर्के, पांडुरंग देशमुख, आण्णासो निंबाळकर, राजाभाऊ सरगर, आदी उपस्थित होते.
श्री काळा मारुती सोसायटी बचाव पॅनल गावांमधील सर्व गट-तट विसरून समविचारी व सोसायटीचे हित जोपासणारी नेते व सभासद एकत्र येऊन पॅनल तयार केलेला होता. सभासदांनी विश्वास ठेवून पॅनलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng