जय हनुमान पॅनलच्या शोभाताई सिद व जय श्रीराम पॅनलच्या सौ. पुष्पावती पालवे यांच्यात समोरासमोर लढत.

मांडवे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मतदारांचा उदंड प्रतिसाद ८८.९६% टक्के मतदान पोल झाले

मांडवे ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये मतदारांनी उदंड प्रतिसाद देत मतदानाची विक्रमी नोंद करत ९१५ पैकी ८१४ मतदान पोल झाले आहे. त्यापैकी पुरुष ४३२ तर स्त्री ३८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे दोन्ही गट प्रमुखांमध्ये काट्यावरची टक्कर अशीच ही लढत झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार ? हे मात्र कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. दोन्ही गट प्रमुखांकडून विजय आपलाच होण्याच्या आशा पल्लवीत होताना दिसत आहेत. परंतु, दोन्ही उमेदवारांचे भवितव्य जनतेने पेटीमध्ये बंद केले आहे. उद्या सोमवार दि. ६ जून रोजी सकाळी ८.३० वा. स्पष्ट होईल की नक्की कोण विजयी ?

मांडवे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या सन २०२२ पोटनिवडणुकीत जय श्रीराम पॅनलच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्पाबाई हनुमंत पालवे आणि जय हनुमान पॅनलच्या सौ. शोभाताई नाथा सिद यांच्यात समोरासमोर लढत झाली आहे. मांडवे ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक माळशिरस तालुक्याचे या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेले आहे. जय श्रीराम पॅनलचे प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच जयवंत पालवे आणि जय हनुमान पॅनलचे प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच तानाजी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली चुरशीची निवडणूक झालेली आहे. उद्याच्या निकालाकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी एस. टी. चव्हाण यांनी काम पाहिले आहे. त्यांना सहकार्य तलाठी उन्हाळे भाऊसाहेब यांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुरंदावडे सोसायटीवर मोहिते पाटील गटाची अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता.
Next articleस्वयंभू हनुमान शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व 13 जागा संपादित करून मिळविले दैदिप्यमान यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here