‘जलयुक्त’ शिवार घोटाळा; तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक

सदर प्रकरणातील ६२ कंत्राटदार संस्था, कृषी अधिकाऱ्यांना सहसंचालकांची नोटीस

बीड (बारामती झटका)

जलयुक्त शिवार योजनेतील कोट्यावधी रुपयांच्या अपहार प्रकरणात पाच वर्षांपासून फरार असलेल्या तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना गुन्हे शाखेच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान १५ फेब्रुवारीच्या रात्री अटक केली. परळी शहरात ही कारवाई करण्यात आली असून पकडलेल्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. दरम्यान, या कामांची ५ पथकांमार्फत चौकशी करण्यात आली होती. पथकाने १५ टक्के कामांची निवड तपासणी केली होती. एकूण ८१५ कामांपैकी १२३ कामे निवडण्यात आली.

असा आहे घोटाळा
एकूण कामे ८१५
तपासणीसाठीची कामे १२३
तपासणी पूर्ण १०३
अनियमितता असलेली कामे ९५

९० लाख रुपयांच्या वसुलीचे आदेश
बहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यात कंत्राटदार संस्था आणि अधिकारांवर तब्बल ९० लाखांची वसुली निश्चित केली आहे. ही रक्कम तातडीने भरण्यासाठी औरंगाबादच्या विभागीय कृषी सहसंचालकांनी कंत्राटदार संस्था व अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

२०१७ मध्ये दाखल झाला होता गुन्हा
या प्रकरणात पाच वर्षांपासून फरार असलेल्या निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. २०१७ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात २ कोटी ४१ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. सुनील दिनकर गीते (वय ५८ रा. हालगे गल्ली, परळी), उल्हास गणपतराव भारती (६४), त्र्यंबक दिगंबर नागरगोजे (६४, दोघे रा. माणिकनगर, परळी) यांना राहत्या घरातून सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व सहकाऱ्यांनी अटक केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत आप्पासाहेब देशमुख विजयी.
Next articleमाळशिरस नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदासाठी शिवाजी देशमुख व पुष्पावती कोळेकर यांच्यात समोरासमोर लढत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here