राष्ट्रकुल कुस्ती आखाड्याचे पुजन व मूर्ती प्रतिष्ठापना रविवार दि. 17 ऑक्टोबर 2021 रोजी होणार…
महाराष्ट्रातील सर्व पैलवान, वस्ताद, कुस्तीप्रेमी यांना आग्रहाचे निमंत्रण.
सांगली ( बारामती झटका )
भारतातील सर्वात मोठे कुस्ती संकुल विटा ता. खानापूर, जि. सांगली येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून स्थापन होत आहे. अनेक सोयीसुविधा असणाऱ्या या संकुलाच्या मूर्ती प्रतिष्ठापना व आखाडा पूजनाचा कार्यक्रम मा. श्री. जयवंतरावजी पाटील यांच्या शुभहस्ते रविवार दि. 17 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत जलसंपदा मंत्री मा.श्री.जयवंतरावजी पाटील हे असणार आहे.तर मा.श्री.विश्वजित कदम (कृषी राज्य मंत्री), मा.श्री. बाळासाहेब पाटील (सहकार मंत्री), मा.श्री.अनिल भाऊ बाबर (आमदार), मा.श्री. संजय काका पाटील (खासदार), मा.श्री.सदाशिव पाटील (मा.आमदार), मा.श्री.श्रीनिवास पाटील (खासदार), मा.श्री.अरुण अण्णा लाड (आमदार), मा.श्री.जगदीश दादा जगताप (व्हा.चेअरमन कृष्णा सह. साखर कारखाना), मा.श्री.पृथ्वीराज बाबा देशमुख (मा.आमदार),मा.श्री.संग्रामसिंह देशमुख (मा.अध्यक्ष जि.प.सांगली) युवा नेते मा.श्री.रोहित आर.आर.पाटीलकुस्ती क्षेत्रातील मान्यवरांसह हिंदकेसरी पै.दिनानाथ सिंह, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पै.राम सारंग, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील, अर्जुनवीर काकासाहेब पवार, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, जेष्ठ कुस्ती निवेदक शंकर पुजारी कोथळीकर, महाराष्ट्र चॅम्पियन पै.धनाजी पाटील आटकेकर, वस्ताद बाजीराव चौगुले, हिंदकेसरी रोहित भाऊ पटेल, अर्जुनवीर Dysp राहुल नाना आवारे, त्रिवार महाराष्ट्र केसरी Dysp नरसिंह यादव, त्रिवार महाराष्ट्र केसरी विजय भाऊ चौधरी, हिंदकेसरी संतोष आबा वेताळ आदी उपस्थित असणार आहेत.
या उदघाटन प्रसंगी सर्व पैलवान, वस्ताद आणि कुस्ती प्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng