जळभावी गावात राजकीय नेत्यांचे एकमेकांचे राजकीय पाणी कमी करण्याच्या नादात गावालाच प्यायला पाणी नाही.

जळभावी ( बारामती झटका )

जळभावी ता. माळशिरस येथे सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये राजकीय नेत्यांच्या कुरघोड्या चालू आहेत. एकमेकांचे राजकीय पाणी कमी करण्याच्या नादात गावातील सर्वसामान्य नागरिक व जनतेला प्यायला पाणी नाही, अशी अवस्था जळभावी गावात झालेली आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये डोंगर कपारीमध्ये वसलेले जळभावी गाव आहे. या गावात अगोदरच पावसाचे कमी प्रमाण असल्याने उजाड ओसाड माळरान आहे. त्यामध्ये राजकीय नेत्यांची एकमेकांमध्ये श्रेय वादाची सुरूअसलेली धडपड त्यामुळे गावच्या सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देण्यासाठी नेत्यांना वेळ नाही. त्यामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली आहे. जळभावी गावांमध्ये पाण्याच्या अडचणीमुळे अनेक लोक स्थलांतरित झालेले आहेत. काही लोक उद्योग व्यवसायानिमित्त बाहेर गावी आहेत. गावामध्ये असणाऱ्या लोकांची तहान भागत नाही, अशी अवस्था झालेली आहे.

अनेक ठिकाणी पाणीच पोहोचत नाही, त्या नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू असते. त्यांच्याकडे पाहायला गावातील राजकीय नेते मंडळी यांना वेळ नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी पाणी मुबलक मिळते, तर काही ठिकाणी पाण्याचा थेंबही मिळत नाही, अशी अवस्था आहे. यासाठी सत्ताधारी व विरोधक यांनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं पण, जनतेला पाणी द्यावं, अशी जनतेची भावना आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, पाणी पिण्याकरता जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांना देखील पाण्याची गरज असते त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पाणी पुरवठा विभाग यांनी त्वरित लक्ष देऊन वंचित असलेल्या नागरिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ जनतेवर आलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपोलीस उपनिरक्षक परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा नाळ फाऊंडेशनच्या वतीने सन्मान
Next articleसंत बाळुमामा गुढीपाडवा भंडारा उत्सव जळभावीमध्ये जल्लोषात साजरा होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here