Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

जळभावी येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान संपन्न

पै.उमेश शिरतोडे आणि पै.जयदीप गायकवाड, पै.संग्राम साळुंखे आणि पै.सुरज मुलाणी यांच्यासह अनेकांच्या चुरशीच्या लढती

जळभावी ( बारामती झटका )

जळभावी ता. माळशिरस येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये सोमवार दि. 18/07/2022 संपन्न झाले.

भव्य जंगी मैदानाची सुरुवात मल्लसम्राट रावसाहेब मगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, युवा नेते दत्ताभैया मगर, माळशिरसचे उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख, डबल सरपंच किरण माने, वस्ताद तानाजी रणवरे सर, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, गोरडवाडी सोसायटीचे माजी चेअरमन खंडूतात्या कळसुले, सरपंच विजयराव गोरड, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, पै. किरण कदम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.

श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त जळभावी गावचे ज्येष्ठ नेते व विद्यमान उपसरपंच आबासाहेब सुळ पाटील, रामोशी समाजाचे युवा नेते लखन बोडरे, नाथा नरूटे, धुळदेव सुळ, आप्पासाहेब सुळ, बाळराजे सुळ, ज्ञानदेव सुळ, डॉ. शुभम धाईंजे, पिंटू कोळेकर, उद्योजक सुरेश गावडे यांच्यासह श्री महालक्ष्मी यात्रा कुस्ती कमिटी जळभावी यांनी मैदानाचे आयोजन केलेले आहे.

सदर कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची 1 लाख 11 हजाराची कुस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, मेडदचे सरपंच नाथाआबा लवटे, मांडकीचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण माने यांच्यावतीने पै. उमेश शिरतोडे, खळवे व पै. जयदेव गायकवाड, पुणे यांच्यामध्ये चुरशीची व अटीतटीची लढत झाली. सदरची कुस्ती बरोबरीत सोडवली.

द्वितीय क्रमांकाची 75 हजार रुपयाची कुस्ती माळशिरसचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, संजयभाऊ चव्हाण, युवा नेते धर्मराज माने यांच्या वतीने पै. संग्राम साळुंखे, सदाशिवनगर व पै. सुरज मुलाणी, खुडूस यांच्यात खडाजंगी व निकराची झुंज झाली. कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

तृतीय क्रमांकाची कुस्ती 51 हजार रुपयाची गोरडवाडीचे माजी सरपंच स्व. निवृत्ती शंकर गोरड यांचे स्मरणार्थ सरपंच विजयी निवृती गोरड, पै. दत्ताभैया मगर, प्रकाश जाधव सर यांच्यावतीने लावण्यात आलेल्या कुस्ती मध्ये पै. समाधान गोरड, पुणे याने नेत्र दीपक विजय मिळविला. यांच्यासह अनेक मल्लांच्या कुस्त्या नेत्र दीपक व चुरशीच्या झाल्या.

सदर मैदानास जिव्हाळा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक भानवसे सर, संदीप भाऊ पांढरे, वस्ताद, कुस्ती शौकीन, पैलवान, जळभावी पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पै. हनुमंत शेंडगे यांनी केलेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort