जांबुड गावचे सुपुत्र प्रा. सागर खटके यांना ‘आचार्य’ पदवी पुरस्काराने सन्मानित

श्रीपूर (बारामती झटका)

दापोली येथील ङॉ. बाळासाहेब सावंत कोकण  कृषि विद्यापीठाच्या ४१ व्या दीक्षांत समारंभामध्ये
जांबुड गावचे सुपुत्र डॉ. सागर लक्ष्मण खटके यांना पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र या शाखेतून आचार्य (पीएच.डी.) पदवी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. रमेशजी बैस यांच्याहस्ते देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास कृषीमंत्री अब्दुल सत्तार, उद्योगमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत, विद्यापीठातील सर्व अधिकिरी, प्राध्यापक, कर्मचारीवर्ग आणि  विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

सागर खटके हे शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन डॉक्टरेट या पदवीपर्यंत कष्टाने व जिद्दीने पोहचले. याबद्दल सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.  तसेच त्यांचे मोठे बंधू राहुल खटके जांबुड सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत. व  वहिनी स्वाती खटके जांबुड ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. आपल्या दोन्ही मुलांनी  वेगवेगळ्या क्षेत्रात घवघवीत यश मिळवल्याबद्दल आई मिताबाई खटके व वडील लक्ष्मण खटके यांनी समाधान व्यक्त करत भावी वाटचालीसाठी शुभाशीर्वाद  दिले. डॉ. सागर खटके सध्या कृषि महाविद्यालय उदगीर (जि. लातूर) येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते ग्रामीण रूग्णालयात अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण रुग्णांचे प्राण वाचण्यास होणार मदत
Next articleमाळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध सौ. पूनम वळकुंदे यांची निवड…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here