जांबुड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महावीर माने बिनविरोध, नारायण पाटील गटाचे पुन्हा वर्चस्व

अकलूज (बारामती झटका)

जांबुड ता. माळशिरस येथील नारायण पाटील गटाचे विद्यमान उपसरपंच प्रकाश कुळमकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावरती निवडणूक लागली होती. या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य महावीर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यांना पुरक म्हणून ग्रा.पं. सदस्या सौ. बाळाबाई धुमाळ यांनी अर्ज दाखल केला होता. विरोधकांचा उमेदवारी अर्ज नसल्याने आणि बाळाबाई धुमाळ यांनी आपला पुरवणी अर्ज माघार घेतल्याने निवडणूक निर्णायक अधिकारी मुंडफणे यांनी निवडीचे अध्यक्ष सरपंच अविनाश खरात यांच्या अध्यक्षतेखाली महावीर माने यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली.

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी हलगीच्या कडकडाटासह फटाक्यांची आतिषबाजी केली आणि सगळा परिसरात दणाणून गेला होता तसेच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन आपला आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी जांबुड ग्रामपंचायतचे गट नेते व माजी उपसरपंच नारायण पाटील, ग्रामसेवक पवार मॅडम, सरपंच अविनाश खरात, जांबुड ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुळमकर, सोनाबाई चंदनशिवे, राजकुमार बाबर, सुप्रिया नाईकनवरे, उषाताई थोरात, बाळाबाई धुमाळ, जेष्ठ नेते नागनाथ कचरे, मुरलीधर कचरे, विलास जयवंत केचे, रविराज बनसोडे, प्रदिप नाईकनवरे, गणेश ननवरे, शिवाजी कचरे, सिताराम पाटील, नितीन पिसाळ, नितीन नाईकनवरे, समाधान नाईकनवरे, रामभाऊ नाईकनवरे, अभिषेक भोसले, दादा शेख, सुनील धुमाळ, पोपट व्हरगळ, दिलीप गुळमकर, तुकाराम व्हरगळ, हनुमंत कचरे, सतिश भुसनर, संजय भुसनर, मोहन नाईकनरे, हिंदुराव वाघमारे, अंकुश धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबेकायदेशीर रस्ता काढणाऱ्या दहिगाव मंडळ अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी – संतोष पाटील.
Next articleकचरेवाडी ग्रामस्थ व रवीशेठ सरगर मित्र मंडळाच्या वतीने वावरे दांपत्य यांचा उत्साही वातावरण व जल्लोषात सन्मान संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here