जांबुड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थीनीचा राज्यात आठवा क्रमांक

जांबूड (बारामती झटका)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबूड, ता. माळशिरस या शाळेची इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी अनुष्का सागर वेदपाठक हिने सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा (IAS) मध्ये 136/150 शेकडा 90.67% गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत 8 व्या क्रमांकाचे स्थान पटकावले.

तिला वर्गशिक्षिका श्रीम सारिका वडवकर मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब, विस्ताराधिकारी नाचणे साहेब, केंद्रप्रमुख देशमुख साहेब, मुख्याध्यापक चिंतलवाड मॅडम तसेच सर्व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती, जांबूड यांनी कौतुक करून भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसाखर कारखानदारांनी टांगले मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तारले…
Next articleनातेपुते येथील अनिश पलंगे यांची स्थापत्य अभियांत्रिक पदी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here