जांबुड सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी राहुल खटके तर, व्हाईस चेअरमनपदी प्रकाश जयवंत यांची निवड.

जांबुड सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते बबनराव खटके व माजी सरपंच ज्येष्ठ नेते शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

युवा नेते राहुल खटके यांची पुनश्च जांबुड विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी निवड…

बोरगाव ( बारामती झटका )

जांबुड (ता. माळशिरस) येथील जांबुड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणुक निर्णय अधिकारी पी. व्ही. कोरे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली.

जांबुड विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते बबनराव धोंडीराम खटके, माजी सरपंच जेष्ठ नेते शिवाजी नरहरी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने चेअरमन पदासाठी राहुल लक्ष्मण खटके व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश जयवंत यांचे एक एक अर्ज दाखल केलेले असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कोरे यांनी बिनविरोध चेअरमन पदी राहुल लक्ष्मण खटके व व्हाईस चेअरमन पदी प्रकाश जयवंत यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी शिवाजी केचे, विजय कचरे, लक्ष्मण खटके, पांडुरंग हुंबे, अर्जुन अडसूळ, माणिक गुळमंकर, हरिदास नलवडे, शरद मारकड, ग्रामपंचायत सदस्य नरहरी कचरे, विलास केचे, बाबुराव लोखंडे, किसन भोसले, सुरज शिंदे, मुरलीधर कचरे, हरिदास कचरे, सचिन गुळमकर, पोपट चंदनशिवे, हनुमंत खटके, भिमराव खटके, आण्णा घोगरे, गोविंद कचरे, संतोष माने, रामचंद्र केचे, विजय केचे, विलास धुमाळ, दादा नायकुडे, रामदास नायकुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नूतन संचालक बबनराव खटके, हरिदास केचे, महादेव निंबाळकर, बलभिम कचरे, मौला कळवात, मंगल भोसले, विजय वेदपाठक, अनिता घोगरे, सुग्रीव चंदनशिव, अंबादास केचे उपस्थित होते. संस्थेचे सचिव राजकुमार भगवंत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी कोरे यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी बिनविरोध जाहीर केल्यानंतर फटाक्यांची आतीषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

युवा नेते राहुल खटके यांनी चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये सभासदांचे हित जोपासून संस्थेची यशस्वी वाटचाल केलेली असल्याने गावातील ज्येष्ठ मंडळी व संचालक यांनी युवा नेते राहुल खटके यांच्यावर विश्वास टाकून पुनश्च चेअरमनपदाची धुरा राहुल खटके यांच्याकडे दिलेली आहे. वाजत गाजत ग्रामदैवत यांचे आशीर्वाद घेण्याकरता नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ आदी मान्यवर रवाना झाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुरंदावडे सोसायटीचे नूतन चेअरमन बाळासो सुळे पाटील यांचा बैलगाडा चालक-मालक संघटनेच्यावतीने सन्मान संपन्न.
Next articleमाळशिरस पंचायत समितीचा प्रशासनातील स्वच्छ कारभार आणि अधिकाऱ्यांच्या स्वागताने गटप्रमुख अनिल पाटील यांची टीम गेली भारावून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here