श्रीपुर (बारामती झटका )

जांबुड ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने दिवाळीनिमित्त सभासदांना १५% टक्के प्रमाणे डिविडेंट वाटप करण्यात आले. जांबुड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्यावतीने गेली अनेक वर्षे सभासदांना लाभांश वाटप करण्यात येत आहे. यंदाही १५ टक्के लाभांशाचे सभासदांना वाटप करण्यात आले. जांबुड येथील पांडुरंग मंदिरामध्ये उपस्थित सभासद व संचालकांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करून सर्व सभासदांना १५ % टक्के प्रमाणे डिविडंट वाटप रक्कम ३,५०,००० वाटप केली आहे. मागील नफा शिल्लक २३,००,००० लाख, चालू वर्षी ३१/०३/२०२१ अखेर नफा ४,७५,००० अशी माहिती सोसायटीचे सचिव राजकुमार भाग्यवंत यांनी दिली.
यावेळी चेअरमन राहुल खटके, व्हा. चेअरमन प्रकाश केचे, संचालक बबनराव खटके, पांडुरंग नायकुडे, हरिदास केचे, हनुमंत पिसाळ, भारत शेंडगे, सुग्रीव चंदनशिवे, अशोक सुरवसे, कमलाबाई शेंडगे, द्रोपदी घोगरे, सचिव राजकुमार भाग्यवंत, शिवाजी केचे, अंबादास केचे, नामदेव पाटील, नरहरी कचरे, पांडुरंग हुंबे, किसन भोसले यांच्यासह संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng