जांभूड येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पहिले बक्षीस ५१ हजार रुपये.

श्रीराम क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ, जांबुड यांच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

जांभूड (बारामती झटका)

श्रीराम क्रिकेट क्लब जांभूड आणि समस्त ग्रामस्थ जांभूड यांच्यावतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. ५ डिसेंबर २०२१ ते दि. ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत शेषाबाई दगडू भोसले स्टेडियम जांभूड, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. या स्पर्धेतील सेमीफायनल पासूनचे सर्व सामने युट्युब वर लाइव्ह राहतील. या स्पर्धेमध्ये एक ग्रामपंचायत एक टीम असणार आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जांभूड येथील पाटील परिवाराच्यावतीने ५१ हजार रु. व चषक, द्वितीय बक्षीस तानाजी सोपनर गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार बाबर आणि चेअरमन राहुल खटके यांच्यावतीने ३१ हजार रु. व चषक, तृतीय बक्षीस समस्त ग्रामस्थ जांबुड यांच्यावतीने २१ हजार रुपये व चषक, चतुर्थ बक्षीस संजय जनार्दन भोसले यांच्यावतीने ११ हजार रुपये व चषक, पाचवे बक्षीस प्रवीण लक्ष्मण शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवी मुंबई यांच्यावतीने ८ हजार रुपये व चषक आणि सहावे बक्षीस मेजर बापू हरिदास कचरे यांच्यावतीने ७ हजार रुपये व चषक स्पर्धकांना देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज असणाऱ्या स्पर्धकाला कै. लखन गोयल यांच्या स्मरणार्थ महावीर संभाजी बनसोडे यांच्यावतीने २५०१ रु, उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्यास कै. बलभीम धोंडीबा बेलदर यांच्या स्मरणार्थ २१०१ रु. आणि उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या कै. रामचंद्र श्रीपती भोसले यांच्या स्मरणार्थ २१०१ रु. बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी सरपंच अविनाश खरात, ग्रामपंचायत सदस्य विलास केचे, पत्रकार शिवाजी धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य नरहरी कचरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुळूमकर, बापुराव मोरे, रणवीर केचे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा चंदनशिवे, महावीर शेंडगे, चेअरमन रघुनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य महावीर माने, ग्रामपंचायत सदस्य नितीन नाईकनवरे, विठ्ठल भोसले, भगवान मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच या स्पर्धेचे कॉमेंटेटर शिवाजी कचरे हे असणार आहेत.

या स्पर्धेविषयी आणखी माहिती हवी असल्यास पुढील नंबरवर संपर्क साधावा. विक्रमसिंह पाटील ९७६५४६०४०४, अहमद मुलाणी ८८८८८४०१८३, महावीर बनसोडे ७७०९५०६०८९, राजकुमार कैसे ७०२०००९४८६, केशव मिसाळ ९८३४६३५६१५.
तरी टेनिस बॉल क्रिकेट प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ जांभूड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार का ?
Next articleखर्डी येथे सीताराम महाराज “भंडारा” नामसप्ताहाची सुरूवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here