श्रीपुर (बारामती झटका)
जांभूड ता. माळशिरस येथील जांभूड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभासदांना जांभूड येथील पांडुरंग मंदिर येथे १५ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले. प्रारंभी सोसायटीचे माजी चेअरमन कै. संजू भिकू नायकुडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर प्रास्ताविकांमध्ये सोसायटीचे चेअरमन राहुल खटके यांनी सोसायटीच्या कारभाराचा आढावा घेऊन सोसायटीच्या वतीने सुरू असलेल्या कामकाजाची यावेळी माहिती देऊन या संस्थेची शंभर टक्के कर्ज वसुली होत असून गेली सात वर्षांपासून संस्था सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याची परंपरा जपली असल्याचे राहुल खटके यांनी सांगितले.

यावेळी सोसायटीचे चेअरमन राहुल खटके, व्हाईस चेअरमन प्रकाश केचे तसेच संचालक बबनराव खटके, बलभीम कचरे, अंबादास केचे, मौला शेख, विजयकुमार वेदपाठक, महादेव निंबाळकर, हनुमंत पिसाळ, किसन भोसले, हरिदास केचे, महादेव घोगरे, सुग्रीव चंदनशिवे या सर्वांच्या हस्ते सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सभासद हरिदास कचरे, गोविंद कचरे, शिवाजी केचे, विजय कचरे विठ्ठल भोसले, नरहरी कचरे, भगवान हुंबे, सचिन बेलदर, विजय केचे, रामदास बेलदर, जगन्नाथ माने देशमुख, वसंत कचरे, नामदेव पाटील, संजय धुमाळ, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी सोसायटीचे सचिव सुनील डिकोळे यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
