Home इतर जातेगाव ते टेंभुर्णी भूसंपादनाचे काम सुरू होणार – सुहास चिटनीस, प्रकल्प संचालक...

जातेगाव ते टेंभुर्णी भूसंपादनाचे काम सुरू होणार – सुहास चिटनीस, प्रकल्प संचालक बांधकाम विभाग, सोलापूर

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचा निर्णय, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या प्रयत्नाला यश

करमाळा (बारामती झटका)

जातेगाव ते टेंभुर्णी राष्ट्रीय राज्य महामार्ग एच ५६१ तात्काळ डीपीआर रिपोर्ट करून सादर करावा व भूसंपादनाची कारवाई सुरू करावी, असे आदेश भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण कार्यालयाने दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी क्रमांक 1510 रोजीच्या पत्राप्रमाणे दिली आहे. या पत्राप्रमाणे वर्षानुवर्षी रखडलेल्या कामांचे प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे.

या प्रश्ना प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिल्ली येथे जाऊन रस्ते मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन दिले होते. यावेळी गडकरी यांनी त्यांचे सहाय्यक बिराजदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते‌. गेल्या दोन महिन्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा घेतला जात होता.

जातेगाव-करमाळा-टेंभुर्णी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावर आत्तापर्यंत अपघातात 72 बळी गेले आहेत. शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
याच रस्त्यातील दुसरा टप्पा असलेला जातेगाव-अहमदनगर हा रस्ता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र हा रस्ता रखडला होता.

सुहास चिटनिस – प्रकल्प संचालक सार्वजनिक बांधकाम विभाग
जातेगाव टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आज आनंदाची गोष्ट असून या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहे. आता लवकरात लवकर आम्ही याप्रकरणी भूसंपादनाची कारवाई सुरू करू व याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करू. आम्हाला वरिष्ठाकडून तसे आदेश प्राप्त झाले असून अहोरात्र काम करून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व बांधकाम खात्याचे अधिकारी कटिबद्ध आहेत
असे सुहास चिटणीस यांनी यावेळी सांगितले.

महेश चिवटे – बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख
याप्रकरणी आम्ही माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली मुक्कामी शिष्टमंडळासह भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या कामासाठी त्यांचे खाजगी सचिव श्री. बिराजदार यांच्यावर या प्रकल्पाची कागदपत्राची पूर्तता करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही सोलापूर, मुंबई, पुणे या तिन्ही कार्यालयाशी संपर्क साधून पाठपुरावा केला. आज त्याचे यश प्राप्त झाले असून करमाळा तालुक्याच्या वाशी यासाठी महत्त्वाचे असणाऱ्या जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पण आता भूसंपादनाची कारवाई झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जमिनीला प्रति गुंठा दहा लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here