सातारा (बारामती झटका)
सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे यांनी अतिशय भावनिक अशी कविता लिहिली आहे. ‘जाळू नका प्रेम…’ या कवितेमध्ये त्यांनी प्रत्येक नात्याचा सखोल प्रेमाविषयी सांगितले आहे. प्रत्येक नातं हे पैशावर नाही तर, प्रेमावर अवलंबून असते.
जाळू नका प्रेम |सुखाचा आधार
आनंदी शेजार | जिव्हाळ्याचा
जातीच्या भेदाने | तोडला भारत
अडवला रथ | प्रगतीचा
लाभासाठी गोड | पुन्हा मारझोड
धर्म होती द्वाड | माणसांचे
अहंकारी जीवन | करती शोषण
सज्जना दुषण | रोज देती
गोऱ्या कातडीला | जातात भाळून
चंचल तिचे मन | करी विश्वासघात
आई वडिलांना | झिडकारती नाती
रोज नवी प्रीती | जग आधुनिक
ओठावरी हास्य | मनी दुष्टपण
लोण्यावर टपून | अशीही नाती
पैशाशी मतलब | काम दाखवेगिरी
ढबू ढोल होऊनी | सांगती कामाची तयारी
चिरडले पिल्लू | चाक वरुनी गेले
मयता प्रेम नाही | तिरडीस मॉल आले
पापात सामील | हे तुझे माझे हात
तरी सत्संगाची | रोज गावात वरात
पडद्यात नारी | धर्म शांतीचे नारे
भोगती ते विद्रूप | अतिरेकी सारे
नवरे मारून | प्रियकर गाती
अपत्या सोडून | वारे उधाणती
जाळू नका प्रेम | साऱ्या विश्वाचा आधार
इवलेसे जीवन | होई बहारदार
जाळूनी पुस्तके माझी | त्यांनी राख केली
जाळले कधीचे प्रेम | कृती पाक केली
अब्रू पांघरून त्यांनी | प्रेम जाळून टाकले
आज साव होऊन | काळे मनी बांधले
जाळू नका प्रेम | संस्कृतीच्या गरती
लालशार इंगळानी |भाजली ही धरती
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng