जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने तुकाराम जयंती साजरी.


वाघोली (बारामती झटका)

दि २फेब्रुवारी रोजी अकलूज ता माळशिरस येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची ४१४वी जयंती जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुरवातीस राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने,तालुका अध्यक्ष डॉ रामचंद्र मोहिते,जिजाऊ ब्रिगेडच्या संघटकअक्कताई , जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सद्यस्यां प्रिया नागणे यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन कुमारी आर्वी व उर्वी माने यांनी जिजाऊ वंदना गायन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.संत तुकाराम महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून मुक्ताई भाजनी मंडळाच्या महिलांनी संत तुकाराम महाराज गाथा पारायण करून उपस्थित महिला भजनी मंडळातील महिलांनी संत तुकाराम महाराज लिखित संगीत भजन गायन केले.
सदर वेळी पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने,सेवा संघाचे तालुका अध्यक्ष डॉ रामचंद्र मोहिते,व्यसन मुक्तीचे मा देशमुख सर,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्या प्रिया नवनाथ नागणे,संघटक आक्काताई माने,जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्ष मनोरमा लावंड,कल्पना मिसाळ, उर्मिला देशमुख,हेमलता सांगडे,लक्ष्मी पताळे, अनिता शेंडगे,सुमन मिसाळ,राधिका शिंदे ,जनाबाई सांगडे आदी महिला व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकारणी सद्यस्यां ,भजनी मंडळाच्या महिला सद्यस्यां उपस्थित होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमनसेच्यावतीने फडतरी गावचे बिनविरोध उपसरपंच प्रा. दुर्योधन पाटील यांचा सन्मान…
Next articleगणेशगाव येथील सालाबाद प्रमाणे श्री स्वयंभू गणेशाचे श्री गणेशयाग गणेश जयंती निमित्त संपन्न होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here