जिजाऊ ब्रिगेड शाखा अकलूज यांचा राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम संपन्न.
माळशिरस ( बारामती झटका )
अकलूज ता. माळशिरस येथील जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेच्यावतीने येथील गोविंद वृद्धाश्रम येथील वृद्धांना दैनंदिन लागणारे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने समाजामध्ये उपेक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतली जाते. समाज उपयोगी कामे करून समाजामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक कामे केलेली आहेत.

सध्या कोरोना महाभयंकर परिस्थिती असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा या उद्देशाने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रम वृद्धाश्रमातील गरीब व गरजू वृद्धांना अन्नधान्य व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांच्याशी हितगूज साधून विचारपूस करून मायेचा हात दिलेला आहे. त्यांनी फळे व आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता. सामाजिक कार्याबद्दल वृद्धांनी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांना आशीर्वाद दिला. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष शिवमती मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुका अध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड, उपाध्यक्ष शिवमती शुभांगी क्षीरसागर, अकलुज शहराध्यक्ष शिवमती शारदा चव्हाण, संघटक शिवमती सुवर्णा घोरपडे आदी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng