जिजाऊ सावित्रीची लेक उत्कृष्ट गृहिणी अंजली यांनी आळंदी-पंढरपूर रोडवर पंढरपुरी चाय व्यवसायाला सुरुवात केली.

फोंडशिरस माहेर, मांडवे सासर, व्यवसाय आळंदी-पंढरपूर रोड नातेपुते अंजली कर्णे स्वतः बीएससी ॲग्री मुलगा व मुलगी बीएससी ॲग्री सुसंस्कृत घराणे.

नातेपुते ( बारामती झटका )

फोंडशिरस येथील महादेव जाधव यांची कन्या व मांडवे गावातील चंद्रकांत कर्णे यांच्या धर्मपत्नी सौ. अंजली कर्णे यांनी आळंदी-पुणे पंढरपूर रोडवर पंढरपुरी चाय व्यवसायाला देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उत्कृष्ट गृहिणी असलेल्या अंजली कर्णे खऱ्या अर्थाने जिजाऊ सावित्रीची लेक आहेत. त्यांनी स्वतः बीएससी ॲग्री शिक्षण घेऊन मुलगा सौरभ व मुलगी संजीवनी यांनाही बीएससी ॲग्री केलेले आहे. उत्कृष्ट गृहिणी उत्कृष्ट शेती करून सध्या पंढरपुरी चाय या व्यवसायामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे.

फोंडशिरस येथील महादेव जाधव घराण्यातील अंजली यांनी बीएससी ॲग्री शिक्षण पूर्ण केल्यानंतर मांडवे गावातील ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कर्णे यांच्याशी दि. 30/4/1990 रोजी विवाह झालेला होता. त्यांना कन्या संजीवनी व मुलगा सौरभ अशी दोन अपत्य आहेत. कर्णे भाऊसाहेब नोकरी निमित्त बाहेर असतात. त्यामुळे सौ. अंजली यांनी मुलांचे शिक्षण व उत्तम शेती करून उत्कृष्ट गृहिणी राहिलेल्या आहेत. त्यांनी आळंदी-पंढरपूर रोडवर नातेपुते नगरपंचायत हद्दीत माहेरी फोंडशिरस व सासरी मांडवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या त्रिकुटावर पंढरपुरी चाय व्यवसायाला सुरुवात केलेली आहे.

परिसरामध्ये व आळंदी-पुणे रोडवरील लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कन्या संजीवनी हिचा विवाह झालेला आहे. तर सौरभ कृषी विज्ञान केंद्र, बारामती केवीके मध्ये आहे. बीएससी ॲग्री झालेले अंजली व सौरभ सुशिक्षित मायलेकरांच्या पंढरपुरी चाय पिण्यासाठी स्थानिक नागरिक व प्रवासी यांची झुंबड उडत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसमाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन.
Next articleMt4 и Mt5

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here