राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी-पुणे-पंढरपूर महामार्गासाठी जमीन भूसंपादन झालेल्या क्षेत्राचा मोबदला मिळावा.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे शिवाजीराव सूळ यांच्या कुटुंबावर आत्मदहनाची दुर्दैवी वेळ…
माळशिरस ( बारामती झटका )
मोरोची ता. माळशिरस येथील शिवाजीराव शंकर सुळ यांची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गासाठी मोरोची ता. माळशिरस येथील गटनंबर 12, 14 व 193 संपादित झालेली आहे. भू संपादित झालेल्या जमिनीतील 193 गटाचे पैसे मिळाले त्याच गटातील विहीर, पाईप लाईन व कंपाऊंड यांचा मोबदला मिळालेला नाही. तर गट नंबर 12 व 14 यामधील जमिनी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शासन नियम 2013 नुसार भूसंपादन क्षेत्राचा मोबदला दिल्याशिवाय काम चालू करू नये. माझ्यावर अन्याय होत आहे. मोबदला न देता रस्त्याचे काम चालु करीत असल्यामुळे दि. 26/1/2022 रोजी सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी दि.25/1/2022 रोजी दिलेल्या पत्रामुळे जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा आदर ठेवून आत्मदहन थांबले. मात्र, न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे पीडित शेतकरी शिवाजीराव शंकर सुळ यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आत्मदहनाची वेळ माझ्या व माझ्या कुटुंबावर आली असल्याचे शिवाजीराव सूळ यांनी सांगितले.
शिवाजीराव सूळ यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी दिलेल्या 20/1/2022 च्या पत्रानुसार सांगितले गट नंबर 193 मधील संपादित झालेल्या क्षेत्राचा मोबदला मिळाला मात्र, विहीर, पाईपलाईन, झाडे व कंपाऊंड यांचा मोबदला मिळालेला नाही. गट क्रमांक 12, 14 मधील भू संपादित झालेल्या क्षेत्राचे पैसे मिळणे बाकी आहे. गटनंबर 12 मधील एकूण संपादित क्षेत्र 2774 चौरस मीटर असून नोटीस क्रमांक 17/2018 दि. 14/02/2020 अन्वये 1873 चौरस मीटर संपादित क्षेत्राची नोटीस देण्यात आली असून सदर नोटीस पैकी 807 चौरस मीटर क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम पार्वतीबाई माणिक सुळ व ऋतुजा तानाजी नारनवर यांना अदा करण्यात आली. पुरवणी नोटीस क्रमांक 17/2018 पुरवणी भाग -2 दि. 27/02/2021 अन्वये 901 चौरस मीटर क्षेत्राची भूसंपादन नुकसानभरपाई नोटीस देण्यात आली. त्यापैकी 388 पार्वतीबाई माणिक सुळ व ऋतुजा तानाजी नारनवर यांना अदा करण्यात आली सदर गटातील उर्वरित 1579 चौरस मीटर क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम अद्याप अदा केली नाही.
सदर नोटिशी मधील भामाबाई शंकर सुळ मयत असून यांचे वारस श्री. शिवाजी शंकर सूळ व श्री. अण्णा शंकर सूळ यांच्यामध्ये उर्वरित 1579 चौरस मीटर क्षेत्राबाबत संमती नसल्याने उर्वरित संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात आली नाही. गट नंबर 14 मधील मूळ नोटीस क्रमांक 17/2018 दि. 14/02/2020 अन्वये संपादित क्षेत्र 1052 चौरस मीटर क्षेत्राची भूसंपादन नुकसान भरपाई श्री. निलेश आनंदराव सूळ व नितीन आनंदराव सुळ यांना दि. 29/09/2020 रोजी रक्कम कार्यालयाकडून अदा करण्यात आली. तरी सदर गट नंबर 14 मधील पुरवणी क्षेत्र नोटीस एस आर क्रमांक 17/2018 पुरवणी भाग- 2 दि. 27/02/2021 अन्वये संपादित क्षेत्र 407 चौरस मीटर असून सदर पुरवणी क्षेत्रांमध्ये 7/12 वरील सह धारक यांची भूसंपादन नुकसान भरपाई रक्कम आदा करणे सहमती नसल्याने जमीन गट नंबर 14 चे पुरवणी 407 चौरस मीटर क्षेत्राची नुकसान भरपाई अद्याप अदा करण्यात आली नाही. गट नंबर 12 व 14 मधील संपादित क्षेत्र मान्य असल्यास 7/12 वरील सर्व धारकांची संमती असल्यास 8 दिवसाच्या आत तिकडील कार्यालयाकडे संमतीपत्र व नुकसान भरपाई मागणी फेरा अर्ज करावा तसेच आपले गट नंबर 193 ,14 व 12 मधील संपादित इतर बाबीचे मूल्यांकन अद्याप संबंधित विभागाकडून तिकडील कार्यालयाकडे प्राप्त नाही तरी संबंधित विभागाकडून संपादित इतर बाबींचे मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर निवाडा तयार करून प्रकल्प संचालक पंढरपूर यांचेकडे मंजुरी कामी पाठवण्याची कारवाई करण्यात येईल. तरी वरीलप्रमाणे संपादित क्षेत्राची वस्तुस्थिती असलेने आपले व अन्य सहा धारकांचे मौजे मोरोची जमीन गट नंबर 12 14 बाबत संमती प्राप्त न झाल्याने आपणास सदर गटाचे संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई देणे कामी प्रलंबित आहे. तरी आपले संमती प्राप्त न झाल्यास सदर गटांमधील क्षेत्राचे भूसंपादन नुकसान भरपाई रक्कम मा. जिल्हा न्यायाधीश – 1 माळशिरस यांचे कोर्टात जमा करण्यात येईल. अर्जात आपण नमूद केल्याप्रमाणे दिनांक 26/01/2022 च्या आत्मदहनापासून परावृत्त व्हावे, असे पत्र पाठवलेले असल्याने आत्मदहनापासून परावृत्त झालो असल्याचे सांगून मात्र न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे
शिवाजीराव सुळ यांनी सांगितले की, शिवाजीराव सूळ यांनी वस्तुस्थिती सांगितली. गट क्रमांक 14 मधील संपादित क्षेत्र 1052 याची नुकसान भरपाई निलेश आनंदराव सूळ व श्री नितीन आनंदराव सुळ यांना देताना एकत्रित गट असताना माझी संमती विना वाटप केले. पुरवणी क्षेत्रात 407 चौरस मीटर क्षेत्राच्या नुकसान भरपाई संबंधित निलेश आनंदराव सूळ व श्री नितीन आनंदराव सुळ यांची संमती घ्या अन्यथा न्यायालयात संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई जमा केली जाईल. बेकायदेशीर 41 लाख 25 हजार 692 रुपये गटनंबर 14 मधील 1552 क्षेत्राचे वाटप असताना माझी संमती नाही आणि पुरवणी 407 चौरस मीटर क्षेत्रालाच सहमती हवे आहे माझे म्हणणे होते. मूळ रक्कम आणि पुरवणी रक्कम न्यायालयातच पाठवायला हवी होती. कारण, सदरच्या गटाचा 2016 साली नंबर 526 दिवाणी न्यायालयात एडवोकेट एस. बी. पाटील यांच्या माध्यमातून दावा सुरू आहे. गटातील हद्दी खुणा यांचे वाटप नाही. सदरच्या गटामध्ये माझे क्षेत्र 02.65 हेक्टर तर निलेश आणि नितीन यांचे 00.40 आर आहे. सदर चे क्षेत्र चतुर सीमा मध्ये दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात गट नंबर 12 लगत अशी आहे.साधारण 150 फुटांचा गटातील रस्त्याचा दर्शनी भाग आहे. माझ्या क्षेत्राचे बेकायदेशीर रक्कम वाटलेली आहे त्यामुळे माझी संपादित झालेल्या जमिनीचे व क्षेत्राची रक्कम मला मिळावी रस्त्याचे काम करू देणार नाही अन्यथा माझ्याकड आत्मदहनाचा शिवाय कुटुंबासह पर्याय नाही असे शिवाजीराव सूळ यांनी सांगितले.
माळशिरस तालुक्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या दोन्ही चौपदरीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या महामार्गासाठी भू संपादित झालेल्या आहेत. अनेक गरीब व अडाणी शेतकरी यांच्यावर हुशार व पुढारी वशिलेबाज शेतकऱ्यांनी एजंटांमार्फत जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केलेल्या आहेत. अनेक लोकांच्या जमिनी भुसंपादन झालेल्या असतानासुद्धा काही लोकांच्या संमतीविना मोबदल्याचे पैसे वाटप केलेले आहेत. अशा पीडित शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनीच्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या मोबाईल नंबर संपर्क साधून कागदपत्रासह भेटावे. आपले म्हणणे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत, वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng