जिल्हा परिषदेची डॉ. दिलीप स्वामी यांनी मान उंचावली तर, बसवेश्वर स्वामी यांनी मान झुकवली

सोलापूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचे कक्ष अधिकारी बसवेश्वर स्वामी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले

सोलापूर ( बारामती झटका )

सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनी जवळजवळ 30 नव्या संकल्पना आणि उपक्रम राबवून महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याची मान उंचावली होती. मात्र, प्रत्येक मंजुरीला दोन टक्के घेणारे समाज कल्याण विभागातील बसवेश्वर स्वामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले असल्याने जिल्हा परिषदेची मान झुकवली आहे. सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील दलित वस्ती योजनेच्या टेबलवरील कर्मचाऱ्याला लाच घेताना सोमवारी समाजकल्याण सभापतींच्या अँटी चेंबरमध्ये रंगेहात पकडण्यात आले.

बसवेश्वर स्वामी, कक्ष अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई समाज कल्याण सभापती यांच्या चेंबरमध्ये झाली. पंधराशे रुपये लाच घेताना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यानंतर समाज कल्याण सभापती यांचे पती कार्यालयातून पसार झाले. बसवेश्वर स्वामी हे मागील अनेक वर्षापासून समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधार योजना या टेबलवर होते, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. शेवटी सोमवारी लाच घेताना त्यांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजताच संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतरंगफळ येथे रेणुका यल्लमा देवीची यात्रा होणार – सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे
Next articleस्वेरीच्या काजल यादव यांची ‘ऍमडॉक्स’ कंपनीमध्ये निवड, मिळाले ४ लाखांचे पॅकेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here