जिल्हा प्रशासन २७ जूनला प्रसिद्ध करणार अंतिम आराखडा
सोलापूर (बारामती झटका)
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप गट आणि गण रचना आराखड्याला विभागीय आयुक्तांनी २२ जून रोजी अंतिम मंजुरी दिली असून यावर आलेले अनेक दावे आणि हरकती फेटाळल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने येत्या २७ जूनला या निवडणुकीसाठीचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करणार आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकार्यांनी २३ मे रोजी प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला होता. यावर हरकती व दावे ६ जून पर्यंत मागविले होते जवळपास ९५ हरकती व दावे दाखल झाले होते त्यांची सुनावणी विभागीय आयुक्तांनी १६ ते १८ जून दरम्यान घेतली होती. मात्र, अनेकांच्या हरकती आणि दाव्यांमध्ये फारसे तथ्य नसल्याने यापैकी अनेक हरकती व दावे फेटाळण्यात आले होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने गट आणि गण रचनेचा आराखडा २२ जून रोजी मंजूर करून विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्याला जिल्हाधिकारी आता येत्या २७ जून रोजी अंतिम प्रसिद्धी देणार आहेत. त्यामुळे अंतिम गट आणि गण रचना कशी असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अनेक इच्छुकांनी अंतिम गट आणि गण रचना कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे हेलपाटे मारायला सुरुवात केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी याला २७ जून रोजी अंतिम प्रसिद्धी देण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे इच्छुकांनी जिल्हा प्रशासनाकडे माहिती मिळवण्यासाठी हेलपाटे मारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अंतिम प्रसिद्धी २७ जून रोजी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng