जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा पिढीचे विचार मंथन

माळशिरस ( बारामती झटका )

आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण रचना झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची युवा पिढीच्या कार्यकर्त्यांच्या विचारमंथन बैठकीला सुरुवात झालेली आहे. माळशिरस येथे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, भारतीय जनता पार्टी ओबीसी माजी जिल्हा कार्याध्यक्ष युवा नेते नागेशमालक वाघमोडे यांची समन्वयाची बैठक श्रीनाथ चौकामध्ये मोसंबी ज्यूसच्या गाड्यावर मनसोक्त मैफिल रंगली होती.

माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील खुर्द आणि बुद्रुक भाजपच्या कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा समन्वय ठेवलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला सुगीचे दिवस येतील, असा अंदाज भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी उमेदवारी चाचणीला सुरुवात केलेली आहे.

एकमेकांचे मत जाणून घेण्याचे काम सुरू आहे. तुझं कसं, माझं कसं, अजून आरक्षण कसं पडते, त्यावर ठरणार आहे. तरी आपण मोर्चेबांधणीला सुरुवात करू, असा संकल्प करून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना संधी मिळावी, यासाठी युवक प्रयत्नशील आहेत. असेच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारीचे संभाव्य दावेदार असणारे मोसंबी ज्यूसचा आस्वाद घेत निवडणुकीच्या मनसोक्त गप्पा रंगलेल्या होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अतिरिक्त कामाचे कौतुक केले
Next articleचि. तेजस झंजे, मेडद आणि चि.सौ.कां. सानिका वाघमोडे, उंबरे (द.) यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here