जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रणनीतीची खुर्द भाजपची बैठक संपन्न.

माळशिरस तालुक्यात तीन दिवस गाव भेट दौऱ्याचे आयोजन

माळशिरस ( बारामती झटका )

सोलापूर जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समिती आगामी निवडणुकी संदर्भात रणनीती आखण्यासाठी माळशिरस येथे शासकीय विश्रामगृह येथे खुर्द भाजपची बैठक संपन्न झाली.

यावेळी भाजपचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा प्रभारी के. के. पाटी, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपाकाका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, उपाध्यक्ष लक्ष्मण उर्फ पिनु माने, सोलापूर जिल्हा माजी जिल्हा चिटणीस सुरेश तरंगे, सोलापूर जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल मदने, भाजपा सोलापूर जिल्हा माजी कार्याध्यक्ष नागेशमालक वाघमोडे, उद्योजक दत्तात्रय शेळके, अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष बाबुराव खिलारे, तालुका उपाध्यक्ष बलभीम जाधव, तालुका उपाध्यक्ष व कुसमोडचे सरपंच तुषार लवटे, ॲड. राहुल लवटे, ॲड. शरद मदने, डॉ. अनिल पाटील, हनुमंत कर्चे, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस युवराज वाघमोडे, उंबरे दहिगावचे ज्येष्ठ नेते सदाशिव नारनवर, तांदुळवाडीचे युवा नेते हर्षवर्धन काकडे, नवनाथ शेगर, विश्वजीत कदम, सुनिल बनकर, युवा नेते मिनल मगर, रणवीर जाधव, मनोज थिटे, भरत रुपनवर, दीपक ढवळे, जब्बार आतार, अनिल खिल्लारे, मनोज जाधव, हनुमंत शिंदे, जळभावीचे नेते भानुदास चोरमले आदी मान्यवरांसह भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता पार्टीच्या खुर्द नेत्यांची बैठक संपन्न झालेली आहे. तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अच्छे दिन आहेत. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आमदार राम सातपुते तिन्ही लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे आहेत. तालुक्यामध्ये विकासाच्या कामांवर तिन्ही लोकप्रतिनिधींचा भर आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महत्त्वाची असणार आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झालेली आहे.

माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये गट व गाव निहाय तीन दिवसांच्या दौऱ्याचे आयोजन केलेले आहे‌. मतदारांची मते जाणून घेऊन इच्छुक उमेदवार यांचीही चाचपणी होणार आहे. येत्या 25, 26, 27 जून 2022 रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दौरा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी हात झटकले, विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी असे काय मागितले ??
Next articleस. ह. जौंधळे विद्यांमदीर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here