महाराष्ट्रातील 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया व नागपूर वगळून 25 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 284 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका प्रारूप प्रभाग रचना करण्याचे सर्व जिल्हाधिकारी यांना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी दि.05/05/2022 रोजी आदेश दिलेले आहेत.
सदरच्या आदेशामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाचा SLP no 19756/2021 04/05/2022 रोजीच्या निर्णयात नमूद केले आहे की, दि. 11/03/2022 रोजीच्या अधिनियमातील सुधारणा अस्तित्वात येण्यापूर्वी दि.10/03/2022 रोजी असलेली प्रभाग रचनेची कार्यवाई ज्या टप्प्यावर होती तेच पासून पुढे आयोगाने कारवाई चालू ठेवावी. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्या प्रभाग रचनेचे कामकाज नमूद कार्यवाही करण्यात येत आहे.
1) नकाशे गुगल नकाशावर सुपर इंपोज करणे.
2) जनगणनेची आकडेवारी लिंक करणे.
उपरोक्त कामकाजाकरिता आपल्या कार्यालयातील प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे एक अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तसेच जनगणनेची आकडेवारी व निवडणूक विभाग निर्वाचक गणाची गाव निहाय आकडेवारी आणि नकाशे सोफ्ट कॉपी सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद दिनांकास कार्यालयीन वेळेत आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.
प्रारुप प्रभाग रचना तपासणीसाठी उपस्थित राहण्याकरता 06/05/2022 पासून 08/05/2022 पर्यंत राहण्याचे कळविले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा 07/05/2022 रोजी आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 68 जिल्हा परिषद गट व 11 पंचायत समित्या अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये नगर पंचायती अस्तित्वात आलेल्या असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गणामध्ये गावांचा फेरबदल होणार आहे. माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाची उत्सुकता लागलेली आहे. आयोगाचे निवडणुकीचे बिगुल वाजलेला असल्याने सर्व इच्छुक आवाजाने जागे झालेले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng