जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस यांच्याविरोधात माळशिरस न्यायालयात निरंतर ताकीदीचा दावा दाखल….

अन्याय झाल्यास फौजदारी दावा दाखल करणार – संतोष माणिकराव पाटील.

गुरसाळे ( बारामती झटका )

गुरसाळे ता. माळशिरस येथील श्री. संतोष माणिक पाटील यांनी माळशिरस येथील सिव्हिल न्यायालयात 1) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर 2) उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस 3) सरपंच ग्रामपंचायत गुरसाळे 4) ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत गुरसाळे यांचे विरोधात निरंतर ताकीदीचा दावा दाखल केलेला आहे. प्रशासनाने अन्याय केल्यास फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल करणार असल्याचे शेतकरी संतोष माणिकराव पाटील यांनी सांगितले. सदरच्या न्यायालयात सादर केलेल्या दाव्यामध्ये प्र. रा. मा. 15 ते गाढवे वस्ती ग्रा.मा. क्रमांक 564 वर वादी संतोष माणिकराव पाटील यांच्या वर्णन केलेल्या मिळकतीचे पश्चिम बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा बेकायदेशीरपणे प्रतिवादीतर्फे नवीन रस्ता करण्याचा प्रयत्न चालवला आहे तो हा या दाव्याचा विषय आहे.

संतोष पाटील यांच्या जमिनी वडिलोपार्जित मालकी वहिवाटीच्या आहेत. सदर जमिनी पूर्वी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्या खंडाने दिलेल्या होत्या. हल्ली सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशानुसार सदर जमिनी या वादी यांचे कब्जे वहिवाटीत शासनाकडून गेलेल्या आहेत. सन 2013 पासून वादी या जमिनी शांततामय कब्जे वहिवाटीत आहेत. सदर जमिनीमध्ये वादी यांचे पीक आहे. अशी परिस्थिती असताना सदर दावा कलम 1अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये प्रतिवादीने यांचा कोणताही पूर्ववत रस्ता अस्तित्वात नव्हता व नाही. सदरील वादी यांचे गट नंबर 661 मध्ये राहते घर आहे. मुख्य रस्त्यापासून वादी यांचे गट नंबर 661 मध्ये घरी जा-ये करण्यासाठी त्यांचे व्यक्तिगत मालकीचा व कब्जे वहीवटीचा सुमारे दहा फूट रस्ता अस्तित्वात आहे. सदर रस्त्यापासून पुढे प्रतिवादी यांचा कोणताही रस्ता अस्तित्वात नव्हता व नाही, अशी परिस्थिती असताना यातील प्रतिवादी नंबर 2 उप अभियंता तसेच प्रतिवादी नंबर 3 सरपंच व 4 ग्रामसेवक यांनी राजकीय दबावापोटी रा.मा. 15 ते गाढवे वस्ती रस्ता रमा क्रमांक 564 वर अतिक्रमण वादी यांनी केले बाबत खोटी व बनावट नोटीस देऊन सदर ठिकाणी वादी यांचे दावा कलम एक मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये दावा कलम 1 ब मध्ये नमूद केले प्रमाणे बेकायदेशीरपणे रस्ता काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

दाव्याचे कारण दि. 13/1/2022 रोजी प्रतिवादी नंबर 2 उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस यांनी संतोष पाटील यांना नोटीस दिली. तसेच प्रतिवादी नंबर 3 सरपंच व नंबर 4 ग्रामसेवक यांनी दि. 12/01/2022 रोजी वादीस नोटीस दिली. वादी यांनी दि. 24/01/2022 रोजी नोटीस उत्तर देऊन सदर ठिकाणी रस्ता नसल्याबाबत कोणतेही अतिक्रमण काढण्याचा अगर नवीन रस्ता न करण्याबाबत खुलासा नोटीस दिली. त्यावर वादी यांना प्रतिवादी नंबर 2 उप अभियंता बांधकाम विभाग माळशिरस यांनी दि. 01/02/2022 रोजी नोटीस देऊन यंत्रणेमार्फत सदरचे अतिक्रमण व रस्ता करण्याबाबत नोटीस दिली व दावा कलम 1 ब मध्ये नमूद केले प्रमाणे नवीन रस्ता काढण्याचे कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मेहरबान कोर्टाचे स्थळसीमा हद्दीमध्ये दाव्यात कारण घडले असून दररोज घडत आहे, असे दाव्यात नमूद केलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप अभियंता, सरपंच, ग्रामसेवक यांना निरंतर ताकदीच्या दाव्याच्या नोटिसा पोहोच होतील. तरीसुद्धा माझ्यावर अन्याय झाल्यास फौजदारी दावा दाखल करणार असल्याचे संतोष माणिकराव पाटील यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकृषि विभागाच्या सहकार्याने छोटे उद्योजक होण्याची सुवर्णसंधी !!
Next articleमेडदचे ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव, अन्यथा उपोषणाचा इशारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here