राज्य मार्ग 15 ते गाढवे वस्ती रस्ता ग्रामा क्रमांक 564 रस्त्यावर अतिक्रमण केले असा आरोप मात्र सदरचा रस्ता दुसरीकडेच प्रशासनाचा अजब कारभार.
माळशिरस ( बारामती झटका)
माळशिरस पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे अभियंता यांनी संतोष माणिक पाटील राहणार गुरसाळे ता. माळशिरस यांना रामा 15 ते गाढवे वस्ती रस्ता ग्राम क्रमांक 564 या जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर अतिक्रमण केले म्हणून नोटीस दिलेली आहे. मात्र, सदरचा रस्ता दुसरीकडेच आहे, प्रशासनाचा अजब कारभार आहे. जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता यांनी चुकीची रस्त्याची नोटीस हातात न देता बंद घराला चिटकून गेलेले आहेत. प्रशासनाचा अजब कारभार असल्याचे पीडित शेतकरी संतोष माणिकराव पाटील यांनी सांगितले.
गुरसाळे गावचे सरपंच राहुल जगताप, पोलीस पाटील प्रकाश चव्हाण पाटील, शाखा अभियंता आय.बी. मुलाणी आणि रमेश कोरटकर यांनी रस्त्याच्या स्थळ पाहणीसाठी भेट दिलेली होती. त्यावेळेस त्यांना पालखी पार ते गाढवे वस्ती दगडी खान गुरसाळे रस्ता क्रमांक 564 याविषयी माहिती सांगितली. सदरचा रस्ता स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. पूर्वीच्या काळी सदरच्या रस्त्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन गुरसाळे गावात होत असताना पुणे पंढरपूर रोड वरील पालखी पार या ठिकाणी आमचे पूर्वज याच रस्त्याने येत होती पालखी पारावर आमच्या गायकवाड पाटील यांच्याकडे मानाची चादर होती यावर पालखी ठेवली जात होती. 1940 साली संतोष पाटील यांच्या पूर्वजांनी भाडेपट्टा वर वालचंद शेठ यांना 30 वर्षाकरता जमिनी खंडाने दिलेल्या होत्या. 1970 साली महाराष्ट्र सरकारने वालचंद शेठच्या खरेदी व भाडेपट्टा जमिनी ताब्यात घेतल्या 1980 साली शासनाने शेती महामंडळाकडे वर्ग केल्या महामंडळाने सदरच्या जमिनी करीत असताना पुणे पंढरपूर रस्त्याला येण्या जाण्या करिता 659, 660, 661 या गटामधून सोयीसाठी रस्ता केलेला होता. त्यामुळे शेती महामंडळाने तयार केलेल्या रस्त्यावर वर्दळ वाढत गेली सदरचा रस्ता गुरसाळे गावाला जाण्याकरता ही वापर होऊ लागला.

पूर्वीचा पालखी पार ते गाढवे वस्ती दगडी खान गुरसाळे रस्ता वापरात कमी आलेला असल्याने सदरच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे त्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून सदरचा रस्ता येण्या-जाण्याचा बंद केला. त्यामुळे शेती महामंडळाने तयार केलेल्या रस्त्यालाच पालखी पार ते गाढवे वस्ती दगडी खान असे समजून रोजगार हमी योजनेतून काही निधी टाकून संतोष पाटील यांच्या 659, 660, 661 क्षेत्राच्या पाठीमागील गुरसाळे बाजूकडे मुरूम टाकण्यात आला. मूळ रस्ता दिलीप गायकवाड यांनी अतिक्रमण करून रस्त्याची वहिवाट बंद केली होती. शेती महामंडळाकडून 2013 साली जमिनी परत देण्याची प्रक्रिया सुरू झाली 2014 साली जमिनीचा मालकी हक्क मिळाला त्यावेळेस 2015 साली गावचे पोलीस पाटील प्रकाश उर्फ विक्रम चव्हाण पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर चर्चेमध्ये संपूर्ण रस्त्याची माहिती सांगितलेली होती. महामंडळाने तयार केलेल्या माझ्या क्षेत्रातील रस्त्याचा शासनाचा अथवा इतर शेतकऱ्याचा अधिकार राहत नाही त्यामुळे जिल्हा परिषद उप अभियंता यांनी दिलेली नोटीस प्रशासनाचा अजब कारभार लागणार आहे कारण राज्य मार्ग 15 गाढवे वस्ती रस्ता क्रमांक 564 रस्त्यावर अतिक्रमण केले असा आरोप करणे चुकीचे आहे उपअभियंता यांनी चुकीच्या रस्त्याची नोटीस देऊन नाहक बदनामी करण्याचे काम केलेले आहे सर्व कायदेशीर बाबींचा पाठपुरावा सुरू आहे लवकरच सत्य बाहेर येईल चुकीचे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असेही संतोष माणिकराव पाटील यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng