जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सुरुवात गणेश जयंती दिवसाचा मुहूर्त.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक जोरदार तयारी सुरू.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रभाग रचनेची सुरुवात गणेश जयंती दिवसाचा मुहूर्त साधून निवडणूक आयोगाने सुरुवात केलेली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत जोरदार तयारी सुरू आहे मात्र प्रभाग रचना नसल्याने कोणत्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये कोणते गाव येथे याकडे लक्ष लागून राहिले होते.
महाराष्ट्र राज्यातील मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर धुळे नंदुरबार अकोला वाशिम भंडारा गोंदिया व नागपूर वगळून राज्य निवडणूक आयोगाने 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अ.गो. जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना 08/02/ 20 22 ते 14 /02/ 20 22 तारखेस प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्याला येत्या 11 फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयोगाच्या दि. ०२/०२/२०२२ च्या पत्रान्वये आपणांस सूचना देण्यात आल्या आहेत. २. सदरचे कामकाज हाताळणारे उप जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीकरिता सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद केलेल्या दिनांकास आयोगाच्या कार्यालयात सकाळी १०.३० वाजता उपस्थित रहावे. तसेच प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणी करण्यासाठी आयोगाचे दि.०४/१०/२०११ च्या आदेशासोबतचे प्रपत्र – १, प्रपत्र – ३, प्रपत्र – ४, प्रपत्र – ६ व प्रपत्र – ७ मधील माहिती (हार्ड तसेच सॉफ्ट कापी Excel Formatसह) तसेच नकाशे इ. कागदपत्रे आणावीत असे नमूद केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबारामती झटका वृत्ताचा भुमी अभिलेख कार्यालयाला झटका, अधिकाऱ्यांनी झटक्यात हद्दी खुणा करून दिल्या – भाजप चिटणीस हनुमंत कर्चे.
Next articleभूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांची धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतय अशी अवस्था झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here