ग्रामीण भागात प्रथमच बेली डान्स प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अकलूज ( बारामती झटका )
साई सहारा मेडीकल हेल्थ अॅण्ड एज्युकेशनल अॅकेडमी अकलुज यांच्या वतीने अकलुज मध्ये दि.२८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असे ३ दिवसिय बेली डान्स प्रक्षिशण शिबिर अॅकेडमीच्या संस्थापिका संचालक डाॅ.श्रध्दा जवंजाळ यांनी माळशिरस तालुक्यातील अकलुज या ठिकाणी प्रथमच आयोजित केले होते. ग्रामीण भागात उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
पुणे,मुंबई व परदेशात व अश्या मोठ्या शहरांनमध्ये शिकवला जाणारा हा बेली डांन्स अकलुज व अकलुज जवळील तालुक्यांन मधील ग्रामीण परीसरातील नागरीकांना शिकण्याची सुवर्णसंधी साई सहारा ने उपलब्द करुन दिली होती.या शिबिरा मध्ये जवळपास ७० विद्यार्थांनी सहभाग नोंदवला होता तसेच या शिबिराची वेळ सकाळी ११ पासुन ते सायंकळी ७ वाजे पर्यंत प्रत्येकाच्या सोयीनुसार दीड तासाच्या बॅचेस मध्ये प्रक्षिशण दिले गेले.

या शिबिराचे उदघाटन जिल्हा परीषदेच्या सदस्या व डाॅटर्स माॅम फाऊंडेशन महाराष्र्ट राज्याच्या अध्यक्षा सौ.शितलदेवी धैर्यशिल मोहीते-पाटील यांच्या हस्ते दि.२८-०९-२०२१ मंगळवार रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले.या बेली डांन्स चे प्रशिक्षण पुणे येथिल प्रसिद्ध रायजिंग स्टार अकॅडमी तसेच शिवतांडव अवाॅर्ड विजेत्या पुण्यातील प्रसिद्ध बेली डांन्सर राईजिंग स्टार अकॅडमीच्या संस्थापिका अंकीता गायकवाड आणि सुप्रसिद्ध बेली डान्सर वरीष्ट शिक्षिका रोशनी काकडे यांच्याकडुन हे प्रशिक्षण दिले गेले.
हे शिबिर पार पाडण्याचे काम कलामृती डांन्स अकॅडमीचे कोरीयोग्राफर प्रताप थोरात सर यांच्या संयुक्त विध्यमाने व साई सहारा मेडीकल हेल्थ एज्युकेशन चे श्रेयश चांडोले, आशुतोष ढवळे व सुरज पिसे यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून पार पडले. सर्व प्रशिक्षणार्थींना अकॅडमी मार्फत सर्टिफिकेट देण्यात आलेसाई सहारा मेडिकल हेल्थ एज्युकेशनल अकॅडमी मार्फत लवकरच यापुढेही भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप विद्यार्थ्यांच्या महिलांच्या हिताचे राबवले जातील असे अकॅडमीचे संचालिका डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng