जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा धुमधडाका.

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या धर्मपत्नी जिल्हा नियोजन समिती सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस संपन्न.

फलटण ( बारामती झटका )

माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या धर्मपत्नी सातारा जिल्हा परिषद सदस्या, जिल्हा नियोजन समिती सदस्या, लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याच्या मार्गदर्शिका ॲड.सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस धुमधडाक्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुशांत निंबाळकर, सातारा जिल्हा आदर्श सरपंच अस्मिता निंबाळकर, आदर्श ग्रामपंचायत विंचुर्णीच्या सरपंच सौ. राणीताई चव्हाण, उपसरपंच सौ. पूनम ईतापे, विंचुर्णी विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन ज्ञानदेव निंबाळकर, कृषिरत्न बी.के. भाऊ निंबाळकर, ग्रामविकास पूरक संस्थेचे संचालक आदी मान्यवरांनी वाढदिवस धूम धडाक्यात साजरा केला.

जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये आपल्या पदाचा लोकांच्या विकासासाठी उपयोग करून लोकहिताची कामे करून जनतेच्या अडीअडचणी सोडविले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक प्रलंबित विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून मतदारसंघांमध्ये लोकाभिमुख कामे केलेली असल्याने वाढदिवसानिमित्त सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया, फेसबुक, व्हाट्सअप आणि प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदाम्पत्याच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली बॅग मूळ मालकाला परत मिळाली.
Next articleअकलूजमध्ये दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सिग्नल पुन्हा पूर्ववत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here