सोलापूर ( बारामती झटका)
सोलापूरच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वर्षाताई लांडगे मॅडम यांनी शंकरराव मोहिते पाटील स्वस्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्षपदी विजयराव मंडलिक यांचा निवडीबद्दल सन्मान केला. सोलापूर जिल्ह्या सघटनेचे अध्यक्ष व सर्व तालुका अध्यक्ष यांच्यावतीने विजय मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला.
शंकरराव मोहिते पाटील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा पुरवठा आधिकारी सौ. वर्षाताई लांडगे मॅडम व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. साळुंखे साहेब यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनिल पेंटर, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री. नितीन पेंटर, विठ्ठल महामुरे, सोलापूर जिल्हा तालुका अध्यक्ष माळशिरस तालुक्यातील संघटनेचे पद अधिकारी श्री. दयानंद शेळके, जाधव सर, युवराज माने, प्रकाश गायकवाड, विठ्ठल भोसले, संजय खराडे, रणजित भगत, सुरज साखरे, प्रकाश माळवदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng