वेळापूर (बारामती झटका)
राष्ट्रीयीकृत बॅंकांप्रमाणे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने किसान क्रेडिट कार्डची सुविधा वाढवावी अशी मागणी वेळापूर विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी केली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँक इन्स्पेक्टर शशिकांत चंदनशिवे यांची बदली झाल्याबद्दल व नूतन बॅंक इन्स्पेक्टर रामचंद्र पवार यांची वेळापूर शाखेत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वेळापूर शाखेस संलग्न सर्व संस्थेच्यावतीने वेळापूर संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांचेहस्ते निरोप तर नूतन बॅंक इन्स्पेक्टर पवार यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
बॅंक इन्स्पेक्टर चंदनशिवे यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत ते म्हणाले, इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एटीएम कार्डवरुन कधीही पैसे काढता येतात. परंतु जिल्हा बॅंकेच्या किसान क्रेडीट कार्डवर अशी सुविधा उपलब्ध नाही. बॅंकवेळे व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशीही पैसे काढण्याची सुविधा बॅंकेने द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सर्व संस्थेचे अध्यक्ष, सचिव दीपक माळवदकर, भागवत मिले, शाखाधिकारी संभाजीराव माने देशमुख आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng