जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे उत्तमराव जानकर यांचे अपील दाखल…

मदनसिंह मोहिते पाटील, शहाजीराव देशमुख, मामासाहेब पांढरे, मालोजीराजे देशमुख यांच्या विरोधात अपील दाखल

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या अपिलावर सुनावणी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतमध्ये होणार…

सोलापूर ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाचे मदनसिंह मोहिते पाटील, शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख, बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे, मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या नामनिर्देशन पत्रावर राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी छाननीच्या वेळी हरकती घेतल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी एल एम शिंदे यांनी हरकती फेटाळून नामनिर्देशन पत्र मंजूर केलेले होते. हरकत फेटाळली असल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम सुधारणा नियम 2007 चे नियम 27 एक नुसार जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अपील दाखल केलेले आहे. सदरच्या अपिलावर सुनावणी दि.12/04/2023 रोजी दुपारी 02 वाजून 30 मिनिटांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ई ब्लॉक जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जिल्हा निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांनी सुनावणी ठेवलेली आहे. उत्तमराव जानकर हे अपील कर्ते असून उत्तरवादी श्री. एल. एम. शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज श्री मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, शहाजीराव मुधोजीराव देशमुख, बापूराव नारायण पांढरे, मालोजीराव शहाजीराव देशमुख त्यांना सुनावणीस आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित रहावे. उपस्थित न राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून निर्णय देण्यात येईल अशी नोटीस सर्व उत्तरवादी यांना दिलेली आहे‌.

सहकारी संस्था मतदारसंघात मदनसिंह मोहिते पाटील, शहाजीराव देशमुख, मालोजीराव देशमुख अशा तीन नामनिर्देश अर्जावर हरकत आहे‌. ग्रामपंचायत मतदार संघात शहाजीराव देशमुख बापूराव पांढरे अशा दोन अर्जावर हरकत आहे. चार व्यक्तींच्या पाच अर्जावर हरकतीची सुनावणी होणार आहे‌. सुनावणीकडे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. नियम व पोटनियमाच्या आधारे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी हरकत घेतलेली होती‌. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळलेली असल्याने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंध यांच्याकडे उत्तमराव जानकर यांनी धाव घेतलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाऊलींचे आळंदीतून ११ जून रोजी होणार प्रस्थान
Next articleमाळशिरस तालुक्यातील वाघोली येथे शेतकरी मेळावा संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here