माळशिरस (बारामती झटका)
जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या चोरमले वस्ती येथे नवीन सिमेंट बंधारा, ग्रामपंचायत कार्यालय येथे RO तसेच स्मशानभूमीत नवीन हातपंप अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन ज्योतीताई पाटील, शिवामृत दुध सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, के.के. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब सरगर (जिल्हाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा), धर्मराज माने (युवा नेते, भाजपा), सचिन रणनवरे (माजी सरपंच, माणकी), मच्छिंद्र कर्णवर, संजय देशमुख, आगवणे साहेब, किसन राऊत (सरपंच, ग्रामपंचायत जळभावी), आप्पासाहेब सुळ (अध्यक्ष, वनव्यवस्थापन समिती), भानुदास चोरमले (तंटामुक्ती अध्यक्ष), दिलीप शेंबडे (ग्रा.प.सदस्य), सुभाष धाईंजे (ग्रा.प. सदस्य) नवनाथ कोळेकर (अध्यक्ष, शाळाव्यवस्थापन समिती), युवराज देशमुख (कॉन्ट्रॅक्टर) आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng