जुन्या पेन्शनसाठी करणार विधानसभेत एल्गार – आ. राम सातपुते

अकलूज येथे तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

अकलूज (बारामती झटका)

युवक शिक्षक बांधवांच्या जुन्या पेन्शन चा विषय घेऊन विधीमंडळात शिक्षकांचा आवाज बुलंद करणार असा इशारा माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी केला.
ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या माळशिरस शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ सन्मान कर्तृत्वाचा सन्मान, तंत्रस्नेहीचा ‘ या सन्मान सोहळ्यात बोलत होते. स्वर्गीय शिक्षक नेते वसंतराव मगर गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरोना काळात पंचायत समिती शिक्षण विभागाचा ऑनलाईन आनंदी शाळा हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यामध्ये गटशिक्षणाधिकारी देशमुख यांच्यासह १४६ तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान करताना शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सभापती शोभा ताई साठे उपसभापती प्रतापराव पाटील, गटविकास अधिकारी श्रिकांत खरात, जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे, सरचिटणीस बब्रुवाहन काशीद, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष चंदाराणी आतकर, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष संजय चेळेकर, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, स्टार आधिकारी महालींग नकाते, अशोक मगर आदि मान्यवर उपस्थित होते.
संभाजीराव थोरात यांनी मोहिते पाटील परिवाराच्या शिक्षकांबद्दल च्या योगदानाचा उल्लेख करून संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील शिक्षकांचे सामाजिक आणि शैक्षणिक योगदान असल्याचे सांगून तंत्रस्नेहीच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. गटविकास अधिकारी श्रीकांत खरात आणि गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनीही शिक्षक संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी नूतन कार्यकारिणीचीही यावेळी घोषणा केली.
………..
तालुका महिला आघाडी : अध्यक्ष- प्रतिभा गोडसे-मोहिते, बीट-माळशिरस; सरचिटणीस: किरण घाडगे-माने, बीट वेळापूर;
तालुका कार्यकारिणी: अध्यक्ष-विजय शिंदे, बीट-नातेपुते; सरचिटणीस-मनोहर एकतपुरे, बीट-वेळापूर; कार्याध्यक्ष-विजय भोसले, बीट -अकलूज, राजकुमार भोसले, बीट-वेळापूर ; कोषाध्यक्ष: संतोष पवार बीट-नातेपुते; प्रसिद्धीप्रमुख- केशव मोरे,बीट माळशिरस; उपाध्यक्ष-विनोद थोरात बीट-अकलूज,राजू गोरवे बीट पिलीव; सल्लागार- बाळासाहेब कांबळे, बीट-अकलूज.
अखिल भारतीय शिक्षक महासंघ संघटक- दिलीप ताटे, बीट-अकलूज.

सन्मान सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शिक्षक संघाचे पदाधिकारी पतसंस्थांचे पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मावळते तालुकाध्यक्ष दिलीप ताटे यांनी केले तर आभार नूतन अध्यक्ष विजय शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन राजू गुरव, सुहास उरवणे, गिरिजा नाईकनवरे, शहजादी काझी यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा मळोलीकरांच्यावतीने सन्मान.
Next articleविद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज सर्वोत्तम – संयोजिका सौ. शुभांगी मेंढे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here