..वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाला खंडाळी पाटबंधारे शाखा अभियंता यांचेकडून केराची टोपली
मानसिक शारीरिक व इतर कोणत्याही होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार
माळशिरस (बारामती झटक)
माळशिरस तालुक्यातील मौजे आनंदनगर येथील ९ चारी (वितरिका क्रमांक ९) वरील दारे क्रमांक १८ व आनंदनगर गट क्रमांक २८ मधील पाटबंधारे हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी जेष्ठ नागरिक कृष्णा महादेव पवार रा. संग्रामनगर (अकलूज) ता. माळशिरस यांनी माळशिरस पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून अखेर मुंबई मंत्रालयात धाव घेतली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २१ जूलै २०२१ रोजी कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण यांना निवेदन दिले.
सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, आपणांस विनंती करतो की मी एक सेवानिवृत्त कर्मचारी असून माझे वय सध्या ७७ वर्ष असून वेळोवेळी संबंधित अधिकारी व शाखा अभियंता उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी अतिक्रमण काढणे बाबत प्रत्यक्ष भेटीद्वारे चर्चा केली. कार्यकारी अभियंता यांनी यापूर्वी अतिक्रमण काढून घेणे बाबत संबंधितांना पत्रव्यवहार द्वारे कळविले होते. तरीही खंडाळी पाटबंधारे शाखा, अकलूज येथे पूर्वी कार्यरत असलेले शाखा अभियंता यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. मौजे आनंदनगर गट क्रमांक २८ मधून वितरिका क्रमांक ९ दारे क्रमांक १८ गेलेला आहे. त्याठिकाणी महंमद सय्यद शेख आणि अलाबक्ष साहेबलाल शेख यांनी पाटबंधारे खात्याच्या हद्दीमध्ये झोपडी वजा घरे बांधून अतिक्रमण केले आहे व माझ्याकडे येणाऱ्या पाण्याचा पाठ मोडून सपाट केला आहे. वितरिका क्रमांक ९ ची रुंदी ही त्यांच्या राहण्यामुळे कमी झालेली आहे, त्यामुळे सद्यस्थितीला वितरीका क्रमांक ९ ला त्यांच्या राहण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांचे खंडाळी शाखा अधिकारी यांच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे मुद्दामहून अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत आहेत.
माळशिरस पाटबंधारे उपविभागीय माळशिरस यांनी अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे आदेश देऊन देखील अतिक्रमण काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, वारंवार खंडाळी शाखा अधिकारी व उपविभागीय अधिकारी माळशिरस पाटबंधारे उपविभाग अधिकारी यांना भेटून अतिक्रमण काढणे बाबत विचारणा केल्यावर मला दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मी यापुर्वी उपोषणास बसणेबाबतचा अर्ज दिला होता परंतु, त्यावेळी कोरोना साथीच्या रोगाची तीव्रता जास्त असल्यामुळे मी उपोषणास बसलो नाही.
तरी माझी आपणास पुन्हा विनंती आहे, पाटबंधारे हद्दीतील सदर ठिकाणचे अतिक्रमण दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी पर्यंत काढावे ही विनंती. अन्यथा मी माळशिरस पाटबंधारे उपविभागीय कार्यालय माळशिरस येथे १ सप्टेंबर २०२१ रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्र दिले होते. त्यावेळी माळशिरस विभागाचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले उपोषण करू नका आठ दिवसामध्ये अतिक्रमण काढतो, तसें लेखी पत्र दिले होते. अद्याप नऊ महिने उलटून गेले कारवाई सुरु आहे व टाळाटाळ करत आहेत. तरी पुढे होणाऱ्या परिणामास आपले पाटबंधारे खाते जबाबदार असणार आहे.
अशा आशयाचे पत्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, अधिक्षक अभियंता पुणे पाटबंधारे पुणे, माळशिरस तहसीलदार, सहाय्यक अभियंता श्रेणी-1 माळशिरस पाटबंधारे उपविभाग माळशिरस, पोलीस निरीक्षक अकलूज, पोलीस निरीक्षक माळशिरस, शाखा अभियंता अधिकारी खंडाळी पाटबंधारे शाखा, अकलूज यांना पत्रव्यवहार केला आहे. व मंत्रालयात ई मेलद्वारे पत्रव्यवहाराच्या प्रति पाठवल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng