नातेपुते नगरपंचायतच्या वतीने 2.40 कोटी च्या विकास कामांचे उद्घाटन
नातेपुते( बारामती झटका)
नातेपुते नगरपंचायतच्या वतीने 2.40 कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन व पूजन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाची सुरुवात नगरपंचायतच्या समोर स्वच्छ सुंदर नातेपुते या उपक्रमाच्या माध्यमातून सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी सफाई कर्मचारी यांच्याकडे अडीच लाख रुपये किमतीचे 15 अत्याधुनिक प्रत्येकी सहा डबे आलेल्या गाड्या देण्यात आल्या. तसेच शासनाकडून पालखी मुक्काम गावासाठी अद्यावत सुविधा असलेले बाजार तळ येथे 20 युनिटचे भव्य शौचालय व पालखी मैदान येथे 20 युनिटचे शौचालय मंजूर झाले असून त्याचा भूमिपूजन व पालखीतळ विकास योजनेअंतर्गत 35 लाख रुपये किमतीचे 10 हायमास्ट लॅम्प बसवून तसेच नातेपुते नगर पंचायत स्वागत फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, मुख्य अधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बांधकाम विभाग सभापती अतुलशेठ पाटील, माजी सरपंच तथा नगरसेवक ॲड. बी.वाय. राऊत, दादासाहेब उराडे, अविनाशभाई दोशी, उद्योजक शक्ती भैय्या पलंगे, नगरसेवक रणजीत पांढरे, सुरेंद्र सोरटे, अण्णा पांढरे, दीपक काळे तसेच पत्रकार बांधव व नगरपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng