झिंजेवस्ती ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत स्वाभिमानी वंचीत आघाडीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी

पिलीव (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथील प्रभाग क्रमांक तिन मधील रिक्त असणाऱ्या दोन जागेसाठी मतदान होऊन आज मतमोजणी झाली. यामध्ये माजी सरपंच विठ्ठलराव मदने – पाटील यांच्या स्वाभीमानी वंचीत आघाडीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यामध्ये बापुराव वाघमारे यांना 320 मते मिळाली तर सत्ताधारी गटाचे शंकर वाघमारे यांना 227 मते मिळाली यामध्ये 92 मतांनी बापुराव वाघमारे विजयी झाले. तर वर्षाताई पांडुरंग कचरे यांना 348 मते तर सत्ताधारी गटाच्या जयश्री जितेंद्र पाटील यांना 260 मते मिळाली. यामध्ये वर्षाताई कचरे या 88 मतांनी विजयी झाल्या.


स्वाभीमानी वंचीत आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कुंडलीक कपने,शिवाजी पिसे,विठ्ठल मदने ( सर ) ,हनुमंत राऊत ,सर्जेराव मदने ,दाजीराम वाघमारे ,हर्षल वाघमारे ,राजेंद्र जाधव,संतोष जाधव,शयामराव गलांडे, मारुती पाटील, शयामराव लेंगरे, मोहन मदने, रुषीकेश देशमुख, भिमराव खरात ,हनुमंत मदने, यांच्या सह स्वाभीमानी वंचित आघाडीच्या कार्यकत्यांनी विशेष परीश्रम घेतले. दोन्ही उमेदवार विजयी घोषित होताच स्वाभीमानी वंचित आघाडीच्या कार्यकत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत तसेच गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यामुळे सत्ता धारी शेतकरी ग्रामविकास आघाडीला धक्का बसला असुन प्रभाग क्रमांक तिन हा माजी सरपंच विठ्ठल राव मदने यांचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले आहे. दोन्ही उमेदवारांच्या विजयानंतर माजी सरपंच विठ्ठल राव मदने यांनी सत्ताधारी पार्टीने या प्रभागात तसेच गावात गेल्या तिन वर्षांत कोणतीही विकास कामे केली नाहीत त्यामुळे जनता वैतागली होती हेच या निटालातु न दिसुन येते असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा.
https://bit.ly/31IKDng.

Previous articleअक्कलकोट तालुक्यातील हाजंगी नगरपंचायतच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष तथा दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुका अध्यक्ष नितीन माने यांच्यासह तिघांचा विजय..
Next articleमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये श्री. आबा धाईंजे व सौ.शोभा धाईंजे पती-पत्नी एकाच वेळी नगरपंचायतीच्या सभागृहात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here