पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती ग्रामपंचायतीच्या प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असणाऱ्या उपसरपंच पदासाठी आज ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उमादेवी जावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच पदासाठी सत्ताधारी शेतकरी ग्रामीण विकास आघाडीच्या मैनाताई अंकुश मदने यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी सरपंच उमादेवी जावळे, प्रकाश पाटील, शिला मेटकरी, जब्बार मुलाणी हे सत्ताधारी गटाचे सदस्य उपस्थितीत होते. तर विरोधी गटाचे सर्व सदस्य यावेळी अनुउपस्तिथीत राहीले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी मुंडफणे यांनी काम पाहिले तर सहाय्यक म्हणून ग्रामसेवीका बुगड मॅडम यांनी काम पाहीले. या उपसरपंच निवडीवेळी माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जावळे, श्यामतात्या मदने, नजीर मुलाणी, बाबुराव पाटील, केशव मदने, राहुल जावळे, सचिन पुकळे, जितेंद्र पाटील, एकनाथ माळी, लहु पाटील, राजाभाऊ मदने, सुनिल मदने, विजय मदने, रघुनाथ वाघमारे, हरी ढोणे, डॉ. समाधान मदने, प्रताप मदने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर नुतन उपसरपंच मैनाताई मदने यांचा सरपंच उमादेवी जावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर फटाके फोडून व गुलालाची उधळण करीत कार्यकत्यांनी जल्लोष केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng