स्व. सुंदराबाई भानुदास शिंदे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन

माळशिरस ( बारामती झटका )
तिरवंडी ता. माळशिरस येथील स्वर्गीय सुंदराबाई भानुदास शिंदे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दि. 10/11/2021 रोजी दुपारी 12.05 वा. आहे. त्यानिमित्त झी टॉकीज फेम सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेत तिरवंडी येथील शिंदे पाटील वस्ती येथे होणार आहे.

तिरवंडी येथील श्री. महादेव भानुदास शिंदे पाटील, श्री. सदाशिव भानुदास शिंदे पाटील, श्री. शिवाजी भानुदास शिंदे पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय सुंदराबाई भानुदास शिंदे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त शिंदे पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng