झी टॉकीज फेम ह.भ.प. शिवलीलाताई पाटील बार्शी यांचे स्व. सौ. लता राऊत यांचे पुण्यस्मरण निमित्त सुश्राव्य किर्तन.

कण्हेर सोसायटीचे माजी चेअरमन व पश्चिम महाराष्ट्र नाभिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राऊत यांच्या धर्मपत्नी तर कुमार महाराष्ट्र चंपियन पैलवान सुरज राऊत यांच्या मातोश्री यांचे प्रथम पुण्यस्मरण.


माळशिरस ( बारामती झटका )

कण्हेर ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन व पश्चिम महाराष्ट्र नाभिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राऊत व कुमार महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सुरज राऊत यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. लता विठ्ठल राऊत यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि. 05/10/2021 रोजी होणार आहे. त्यानिमित्त समाज प्रबोधनकार झी टॉकीज फेम ह. भ. प. शिवलीलाताई पाटील, बार्शी यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन करून होणार आहे. दु. ११ वाजता पुष्पवृष्टी करून प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.


श्री. तुकाराम शंकर राऊत व सौ. लीलावती तुकाराम राऊत त्यांना दोन मुले श्री. विठ्ठल व श्री. रामदास अशी आहेत. त्यापैकी श्री. विठ्ठल राऊत यांचा चाकाटी गावचे अंबादास ननवरे यांची कन्या लताबाई ननवरे यांच्याशी 1996 साली विवाह झालेला होता. श्री. विठ्ठल व सौ. लता यांना पै. शुभम व पै. सुरज अशी दोन मुले आहेत.

राऊत घराण्यांमध्ये पहिल्यापासून पहिलवानकीचा नाद होता. तुकाराम राऊत आणि विठ्ठल राऊत यांनी त्या काळामध्ये मोठमोठ्या मल्लांशी कुस्त्या करून नाव कमावलेले होते. विठ्ठल राऊत हे माळशिरस प्रशाला माळशिरस येथे शिक्षक म्हणून प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्र नाभिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी नाभिक संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे पद भूषविलेले आहे. त्यांचे मुळगाव कण्हेर आहे. या गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पद भूषविलेले आहे.

घराण्यातील पैलवानकीचा वारसा आपल्या मुलांनी जपावा, अशी स्वर्गीय सौ. लता राऊत यांच्याबरोबर राऊत परिवाराची इच्छा होती. त्याप्रमाणे कुस्ती क्षेत्रांमध्ये पैलवान शुभम व पैलवान सुरज यांनी कमी वयात कुस्ती क्षेत्रात जास्त प्रगती केलेली आहे. पैलवान सुरज याने नाशिक येथे 2011 साली कुमार महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळवलेला होता. त्यावेळेला लता राऊत यांना आपल्या मुलांच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीबद्दल अभिमान वाटत असे. मुलांनी अनेक पदके व बक्षिसे मिळवलेली आहेत. गेल्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लता राऊत यांचे दुःखद निधन झाले. राऊत परीवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. स्वर्गीय लता राऊत यांच्या पश्चात शुभम व सुरज यांची कुस्ती क्षेत्रात घोडदौड सुरूच आहे. सिद्धेवाडी ता. मिरज, जि. सांगली या ठिकाणी सुरज याने चांदीची गदा मिळवली परंतु, गदा पाहण्याकरता आई स्वर्गलोकी गेलेल्या होत्या. त्याचे शल्य कायम मनामध्ये राहत आहे.

वर्षश्राद्ध होण्याच्या आत लग्न करणे गरजेचे असल्याने पैलवान शुभम राऊत यांचा इंदापूर तालुक्यातील साक्षी ठोंबरे यांच्याशी दोन महिन्यापूर्वी विवाह झालेला आहे . काळ थांबत नाही, बघता बघता सौ. लता विठ्ठल राऊत यांना वर्ष पूर्ण होत आहे‌ त्यानिमित्त राऊत परिवार यांनी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल ला 11,111/- रुपयाची देणगी .
Next articleखुडूस येथील कालकथित ज्ञानदेव उर्फ बापू लोंढे यांच्या जयंतीनिमित्त मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here