स्व. हनुमंत वाघोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
पुरंदावडे (बारामती झटका)
पुरंदावडे ता. माळशिरस येथे कै. हनुमंत (आबा) तुळशीराम वाघोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झी टॉकीज फेम ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन मंगळवार दि. १७/५/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये करण्यात आले आहे. यानंतर १२.५ मिनिटांनी पुष्पवृष्टी होऊन आरती करण्यात येईल.

कै. हनुमंत वाघोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ नातेवाईक आणि मित्र मंडळांनी घेण्याचे आवाहन श्री. कृष्णा तुळशीराम वाघोले, चि. रणजीत हनुमंत वाघोले आणि समस्त वाघोले परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng