टाटा-कोयनेच्या पाण्यासाठी माळशिरस भाजपचे सर्व पदाधिकारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार


सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याबाबत राज्यशासनाने दगाफटका केल्यास आम्ही सहन करणार नाही – संजय देशमुख 

प्रफुल्ल कदम यांच्या सातही मागण्याबाबत राज्य शासनाने त्वरित खुलासा करावा

माळशिरस (बारामती झटका)

टाटांच्या सहा धरणातील 48.97 टीएमसी आणि कोयना धरणातील 67.5 टीएमसी असे एकूण तब्बल 116 टीएमसी एवढे प्रचंड समुद्राला वाहून जाणारे अवजल पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला टप्याटप्याने वळविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दि. 2ऑगस्ट 1999 रोजी अभ्यास समिती नेमण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. तथापि नवीन आलेल्या शासनाने या संदर्भात कोणतेही सकारात्मक पाऊले उचलले नाही. उलट हे पाणी दुसरीकडे पळवण्याचा संशय प्रफुल्ल कदम यांच्या आंदोलनामुळे निर्माण झाला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याबाबत आम्ही कोणताही दगा फटका सहन करणार नाही. त्यासाठी आम्ही माळशिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारी गुरुवारी 11 वाजता जिल्हाधिकारी यांना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांनी दिली आहे.

प्रफुल्ल कदम यांच्या सातही मागण्या योग्य असून राज्यशासनाने (किंवा पालकमंत्र्यांनी) याचा खुलासा केला पाहिजे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा स्पष्ट इशारा दिला आहे. यापूर्वीही पालकमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी उजनीचे पाणी बारामतीकडे वळविण्याचा घाट घातला होता, तो आम्ही हाणून पाडला आहे‌ आता सुद्धा टाटा व कोयना धरणातील सोलापूर शहर व जिल्ह्याच्या हक्काचे पाणी सुरुवातीलाच दिशाभूल करून वेगळ्या प्रकारे दुसरीकडे वळवण्याचा संशय निर्माण झाला आहे तो आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांनी दिला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबनावट सही करून गैरवापर करणाऱ्यावर फौजदारी दाखल करा : सरपंच किसन रामा राऊत.
Next articleमेडद येथे काळभैरवनाथ यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here