“टेस्ला” कंपनीच्या गाड्यांची, पार्टची निर्मिती व इतर संशोधन महाराष्ट्रात होणे हे महाराष्ट्रासाठी आवश्यक – रविकांत वरपे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांची घेतली भेट

मुंबई (बारामती झटका)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली. यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासमवेत महाराष्ट्रातील युवकांच्या रोजगार, उद्योग व व्यवसाय संबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील युवकांना रोजगार निर्मिती व्हावी याकरिता “टेस्ला” या आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी व इतर परदेशी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची “हाय पॉवर कमिटी” महाराष्ट्रात स्थापन होण्यासाठी प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांना पत्र दिले.

याविषयी अधिक बोलताना रविकांत वरपे म्हणाले कि, आजच्या काळात माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा व इलेक्ट्रिक क्षेत्रात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार असून जगातील वाहन उद्योगात इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहनांची खरेदी वाढत आहे. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणारा “टेस्ला” हा वाहन उद्योग समूह देशात येवू पाहत असून इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी ही जागतिक कंपनी ‘स्पेस एक्स’ नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर पृथ्वी सोबतच इतर ग्रहावरील दळणवळण क्षेत्र अमूलाग्र बदल करत आहे. यामध्ये आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स, इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानावर आधारीत मोठी क्रांती पुढील काळात जगात होणार आहे. या क्षेत्रात आपला महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी “टेस्ला” कंपनीच्या गाड्यांची, पार्टची निर्मिती व इतर संशोधन महाराष्ट्रात होणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक असून त्यासाठी ही कंपनी महाराष्ट्र राज्यात येण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ धोरणकर्ते, उच्च प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, शास्त्रज्ञ आणि वाहन उद्योगातील तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली हाय पॉवर कमिटी स्थापन करण्यात यावी. टेस्ला व इतर परदेशी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी या कमिटीचे कामकाज महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात पुणे-मुंबई व इतर शहरात ‘टेस्ला कंपनीला आवश्यक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध आहेत. आय टी इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहेत. आय टी व इंजिनिअरिंग मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर राज्यात उपलब्ध आहे. वीज निर्मिती आणि दळणवळण Manufacturing Hub, पोर्ट सुविधा, आंतरराष्ट्रीय विमानतळ व भव्य पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. नविन इलेक्ट्रिक वाहन खरेदीची मानसिकता वाढीला लागलेली असून इंधन वाहन वेन्डरर्स यांना इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळण्यासाठी “टेस्ला” सारख्या उद्योगांची गरज आहे. “टेस्ला” महाराष्ट्र राज्यात आणण्याने जागतिक आधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्राची मान उंचावली जाणार असून टेस्ला सारख्या कंपन्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी संपर्क स्थापन करणे, प्रोत्साहन देण्यास राज्य सरकारने तत्परता दाखवून प्रभावी व जलद निर्णय घेणे अपेक्षित आहे. टेस्लाच्या राज्यात येण्याने राज्यांत लाखो रोजगार निर्मिती नक्कीच होईल, पण यासोबतच आपला महाराष्ट्र हा अत्याधुनिक आणि अद्यावत अशा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचा मानबिंदू होईल. यावेळी शरदचंद्रजी पवार साहेबांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र सरकार व उद्योग क्षेत्रातील उद्योजक यांची एक उच्चस्तरीय बैठक खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणार आहे. टेस्ला महाराष्ट्रात येऊन राज्यात लाखो रोजगारांची निर्मिती व्हावी, यासाठी माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहिल. हा मनोदय आज मी साहेबांपुढे व्यक्त केला आहे. खा. शरदचंद्रजी पवार साहेब हे यासाठी उत्सुक असून महाराष्ट्रातील युवकांच्या रोजगार क्रांतीची ही सुरवात आहे. असेही ते म्हणाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराज्यस्तरीय यल्बो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यासागर महाजन याचा सत्कार
Next articleगुरसाळे गावातील छत्रपती पाणीवापर संस्थेची शेतकऱ्यांवर आडमुठी भूमिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here