डाळिंब दशा आणि दिशा भाग – २ सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

शेतकरी बांधवांनो, मागील लेखात डाळिंब पीन होल बोरर या दशाचे एकात्मिक नियंत्रणाबाबत सविस्तर उहापोह केला. आपण या लेखात डाळिंब तेलकट रोग / बैकरेरिअल बलाईट / तेल्या रोगाचे एकत्मिक नियंत्रणाबाबत विचार मंथण करू या. हा रोग झॅन्थोमोनाज अकझोनोपोडीस युनिक या जिवाणूमुळे होत असून यास ३० ते ४० सेंटी ग्रेड तापमान व ५० ते ९०% आर्द्रता पोषक आहे व तो ३६ ते ८८ % आर्द्रता ‘ मध्यम स्वरूपातील ससत पडणाऱ्या पावसाने झटपाट्याने वाढतो व या पीकाचे ६० ते ८० % नुकसान करतो. रोगगुस्त पाने, फळे, फांद्या यामध्ये २४० दिवस सुप्तावस्थेत राहून पोषक वातावरणात दहाहजार पटीत वाढत असतो.

रोगाचा प्रसार – याचा प्रसार रोगट बागेतील रोपे, रोगट पृष्टभागावरून उडणारे पावसाचे थेंब, तुषार हवेद्वारे दूर वाहून गेल्याने तसेच छाटणी औजारे, रोगट झाडाच्या संपर्कातील मजूर औषध मारणारे व्यकती, रोगट झाडाबरोबर संपर्क झालेली हवा, पाणी, किडी, अळी, फुलपांखरे, माश्या, कीडे व्यवहारासाठी एका बागेतून दुसऱ्या बागेत आलेले, व्यापारी सल्लागार इत्यादीमुळे होतो. म्हणून या रोगाचे प्रतिबंधात्मक उपचारात्मक व लागवड नियोजन करणे खुप महत्वाचे आहे. यासाठी आपण या रोगाची प्रथमथः ओळख करून घेऊया. हया रोगाचा प्रार्दुभाव प्रामुख्याने पाने, फळे, खोड, देठ यावर होतो. १ – पानावर २ ते ५ मि.मि. आकाराचे वेडेवाकटे तपकिरी काळ्या रंगाचे पोकळ पिवळ्या पानेदार कडाने वेढलेले ठिपके दिसतात व ते मध्य रेषा काळी पडून पिवळे पडतात व पाने गळतात. २ – खोडावर काळपट अथवा काळे खोलगट चट्टे कालांतराने गोलाकार पसरतात फांद्या तडकतात व दाब दिला किंवा वा-यांने मोडतात . ३ – फुले, फळे, देठावर, काळे टिपके कालांतराने मोठे होऊन इंग्रजी Y, L आकाराचे पडून फळे तडकतात .

प्रतिबंधात्मक उपाय – हे सर्व उपाय डाळिंब लागवड क्षेत्र असणाऱ्या सर्व लाभार्थीनी एकच बहार व एकसंघ सर्वानी करणे गरजेचे आहे. या रोगासाठी एकसंघ संघटीत सामुहीक एकजुटीने प्रतिबंधत्मक उपायच पर्याय आहे. १ – नवीन लागवड करताना रोगमुक्त निरोगी बागेतील मातृवृक्षावरीलच रोपे वापरावी. २ – छाटणी करतेवेळी झाड छाटणी, कात्र्या, सिकेटर फवारणी, औजारे, खुरपी, सोडीयम हायपोकलाराईट १% किंवा डेटॉल पाणी निर्जतुकीकरण करूनच वापरावीत. ३ – बहार धरलेनंतर फळधारणा झाली की पीक संरक्षण जाळीचे झाडाला आच्छादन करावे यामुळे ४०% नियंत्रण होते . ४ प्रार्दुभाव ग्रस्त बागेतून निरोगी बागेत मजूर औजारे व्हिजीटर व्यापारी यांचा प्रतिबंध करावा . ५ – छाटणी केलेल्या फांद्या फुले फळे यांचे अवशेष बांधावर शेतावर रस्त्यावर न टाकता ते पुरुन टाकावे अथवा जाळून टाकावेत . ६ – छाटणी व राहीलेल्या अवशेष साफसफाई नंतर ब्लिचिग पावडर / कलोरीन पावडर १५० ग्रॅम ५ लिटर पाणी किंवा ४% कॉपर डस्ट २० किलो प्रति हेक्टर ड्रेचिंग करावे किंवा झाडावर घुरळणी करावी . ७ – रोगट फादया खोड ३ इंच खाली छाट देऊन १०% बोर्डो पेस्ट लेप द्यावा व १% बोर्डो ची फवारणी करणे गरजेचे आहे. ८ – बागेला शक्यतो प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करावा . ९ – झाडास पुरेशा सुर्यप्रकाश साठी शेडा छाटणी करणे व वेळोवेळी मोकळा ठेवणे . १०- थ्रीप्स मार्फत होणारा प्रसार रोखणे साठे बागेचे चोह बाजूस १ मीटर उंचीची शेडनेट पडदा लावने . वरील प्रमाणे डाळीब दशा वर उपाय केले तर नक्कीच या दशाचा प्रतिबध होईल . आता आपन उपचारात्मक उपाय बघूया – १ – पहिली फवारणी छाटणी नंतर १% बोर्डो ची करावी ( १ कि मोरचुद + १ किलो चुना + १०० लि पाणी) २ – स्ट्रेप्टोसायक्लीन २.५ ग्रॅम + कॉपर ऑक्झीकलाराईड २५ ग्रॅम १० लिटर पाणी याची दुसरी फवारणी करावी . ३ -बोर्डो ( ०४% ) ४०० ग्रैम + ४०० ग्रॅम चुना + १०० लिटर पाणी तीसरी फवारणी . ४ – स्ट्रेप्टोसायकलीन २.५ ग्रॅम + काबेन्डेझीम १० ग्रॅम + १० लिटर पाणी चौथी फवारणी करावी . वरील सर्व फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात जर ढगाळ वातावर झिरझिर पाऊस जास्त अद्रिता व मध्येच वाढणारे तपमान असेल तर फवारण्या १० दिवसाचे अंतराने करणे गरजेचे आहे . अशा प्रकारे पर प्रथम प्राध्यान्याने प्रतिबधात्मक व उपचारात्मक उपाय योजना केली तर नक्कीच आपण डाळींबाच्या या दशावर उपाय करून होणारे ८०% पर्यतचे फळांचे नुकसान टाळू शकतो यात काय शंका नसावी !! या दशेवरील उपायसाठी एकनुत एकसंघ सामुहिक संघटीत उपाय करणे ही काळाची गरज आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleहोमिओपॅथिच्या राजाश्रयासाठी प्रयत्नशील राहणार – महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी
Next articleऊसाची तोडणी शेतकऱ्यांच्या आले नाकी नऊ, एकरी सात ते आठ हजारांची मागणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here