डाळिंब दशा आणि दिशा भाग- ३ सतीश कचरे ‘मंडळ कृषि अधिकारी नातेपुते.

नातेपुते (बारामती झटका)

शेतकरी बांधवांनो, आपण डाळिंब दशा आणि दिशा भाग -१ पीन होल बोरर भाग -२ तेल्या रोग नियंत्रण बाबत विचार विरमर्ष केला भाग – ३ मध्ये एकात्मिक व सामुदायिकरित्य प्रतिबंधात्मक व उपाचारात्मक रित्या मर रोग या दशा च्या उपाययोजना बघूया !! डाळिंब मर रोग मुळे हेक्टरी झाडाची संख्या कमी होऊन न भरून निघणार नुकसान होते.

या रोगाची कारणे – प्रामुख्याने प्रार्दुभाव ‘ खोड किडा ‘ फ्युजेरिअम रायझोक्टोनिया सिरॅटोसिस्टीस ‘ फायटो फथेरा या बुरशी व आती पाणी वापर आणि काळ्या जमिनील लागवड यामुळे येतो. लक्षणे – जमिनीलगत खोड साल कुजणे ‘ मुळावरील गाठी यामध्ये खालच्या भागात बुरशी वाढते. यामुळे जलवाहिन्या रसवाहीन्या चोक होऊन शेंड्याची पाने पिवळी पडतात. फांद्या वाळून झाडे मरतात आणि झाडे मरण्याचे उभ्या व आडव्या रागां दिसून येतात. या रोगाचे सामुदायिक एकात्मिकरित्य प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपायांचा खालील प्रमाणे अवलंब करावा.

प्रतिबंधात्मक उपाय – प्रतिबंध हा उपचारापेक्षा कधीही सरस असतो. या नियमाप्रमाणे १ – हलकी व मध्यम प्रतीचीच जमिन निवड करावी. २ – रोग विरहीत सुत्रकृमी विरहीत रोपे निवड व लागवड. ३ – सतत ओलावा राहून राल कुजून बुरशी वाढ रोखने साठी गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीन झाडाचे वयानुसार झाडाचे खोडापासून १.५ ते ३ फुट लांब ड्रीपर चे नियोजन करणे. ४ – सुत्रकृमी ग्रस्त किंवा फळभाज्या घेतलेल्या क्षेत्रावरील माती गुठठी साठी पिशवी भरणेस न वापरणे. ५ – लागवडीपूर्वी खडे ४.५ मी x ३ मीटर वर १ x १ x १ मी आकाराचे काढून उन्हात १ महीना प्लॅस्टीक कागद टाकून हवा बंद करून तपावून लागवड करावी. ६ – कॉल्शिअम हायपोक्लोराईड १०० ग्रॅम प्रति खडडा धुरळावे . ७ – कलोरोपायरीफॉस ५ ० मिली १० लिटर पाण्यात मिसळून खड्यात सोडावे. ८ – कार्बेन्डेझिम १० ग्रैम + ५ लिटर पाणी यांचे मिश्रण खडड्यात सोडावे. ९ – लागवडीवेळी २० किलो शेणखत ‘ गांडूळखत २ किलो निबोळी पेंड ३ किलो ‘ २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व अॅझ टोबॅक्टर व पीएसबी यांचे मिश्रणाने खडडा भरावा. १० – सुत्रकुमीचा प्रार्दुभाव मुळावर गाठी दिसत असतील तर झाडांच्या बुध्या जवळ चारी दिशाने आफ्रीकन झेंडू लागवड करावी. वरील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपचार करणे गरजेचे आहे.

रोग झालेनंतर खालील प्रमाणे उपाचारात्मक उपाययोजना करावी. १ – प्रार्दुभावग्रस्त बागेत १५ मिली हॅकझाकोनॅझोल किंवा प्रोपीकोनॅझोल किंवा कार्बेन्डेझीम २० ग्रॅम यापैकी एक + २५ मिलि कलोरोपायरीफॉस १० लि पाणी झाड भोवती दुपारी १२ वा जिथे सावली पडते तिथे रिंग पद्धतीने द्यावे. २ – झाडे छाटणी नंतर १०% बोर्डोपेस्ट ( १किलो मोरचूद + १ किलो कळीचा चुना + १० लिटर पाणी मिश्रण ) पेस्ट बुद्धा व छाटणी फाद्यांना लावावा. ३ – फायटोपथोरा बुरशी साठी मेटालॅझ्झीन ८% + मॅन्कोझेब ६ ४ % -२ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आळवणी ड्रेचिग द्यावे. ४ – बहार धरणे पूर्वी व बहार संपले नंतर वर्षातून २ वेळा पॅसिलोमायसिस + ट्रायकोड्रमा ५० ग्रॅम + १० लिटर पाण्यातून आळवणी ड्रेनिग द्यावे. ५ प्रार्दुभाव ग्रस्त झाडे काढून टाकावीत व काढताना त्याचे सानिध्यातील माती मुळ ‘खोड यांचे अवशेष इतरत पसरू देऊ नये. दुरवर गोळा करून जाळून नष्ट करावेत. ६ – बागेत प्रार्दुभाव आढळून आलेवर निरोगी झाडे व रोगग्रस्त झाडे यांचे मध्ये ३ते ४ फुटाचा चर काढावा. ७ – बागेत प्लॅस्टीक पेपर आच्छादनाचा वापर करावा. डाळीब मर रोग दशावर प्रतिबंधात्मक ‘ उपचारात्मक ‘ एकत्रीतरीत्या ‘ सामुदायीक ‘ एकात्मिकरित्या उपाययोजना केली तर नक्कीच आपणास दिशा मिळेल यात तिळमात्र शंका नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलावणी लोककला ही महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे – सौ. शितलदेवी मोहिते पाटील
Next articleजयसिंह मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील समर्थक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमने-सामने.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here