डाळींब दशा आणि दिशा – भाग – १ – सतीश कचरे

नातेपुते (बारामती झटका)

उजाड माळावर काटेरी झुडपे बोर पीक हो ज्या जमिनित येत नाही तिथे डाळींब पीक सुक्ष्म सिंचनावर चांगले येऊन माळाचे नंदनवन करणारे महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम करणाऱ्या राहणीमान, वाढविणाऱ्या, दरडोई उत्पन्न वाढविणारे व राष्ट्रीला परकीय चलन मिळवून देणाऱ्या या, कल्पवृक्ष पिकाला सध्या डाळींब पिक मर रोग, तेल्या रोगा फळकुजव्या, व डाळींब खोड किडा /पीन होल बोरर यांच्या दशाने पिडून जाऊन बरेच क्षेत्र कमी झाल्याने परत माळे उजाड होऊ लागली आहेत. आजच्या लेखात डाळींब खोडकिडा / पीन होल बोरर या किडीचे एकात्मीक नियंत्रण वर उहापोह करुया.

वर्षभर सक्रिय असणाऱ्या या किडीचा प्रौढ डाळींब, पेरु, आंबा, साग या पिकाची उघडी मुळे खोड व फांद्यांवर टाचणी, पीन आकाराचे छिद्र घेऊन आतील लाकडाचा भुसा बाहेर टाकतात. यामुळे खोड, फांद्या व मुळ यातील रसवाहिन्या व जलवाहिन्या खंडीत होतात व अन्नद्रव्य व पाणी कमतरता मुळे पाने पिवळी पडतात, कोमेजतात. यामुळे फांद्या, खोड वाळतात व मर होते. या पिन होल मध्ये मादी आंडी घालतात‌. ४ दिवसात अळी तयार होऊल तयार झालेल्या अॅम्बेसिया बुरशीबर अळी जगून ७ – ९ दिवसात कोष तयार होऊन ४ दिवसात किडी तयार होते. अशा प्रकारे एका आठवड्यात जीवन क्रिया होऊन किडीचा उर्द्रक होतो. पीन होलमध्ये बुरशी वाढून ही पीक प्रार्दुभाव ग्रस्त होते.

यावर उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाय खालील प्रमाणे करावा. १ – एकात्मिक अन्नद्रव्ये सह पोषण करणे २ – अतिपाणी व अवर्षण ताण पासून बागेचा बचाव . ३ तण मुक्त पिक ठेवणे ४ – प्रार्दुभाव ग्रस्त झाडे फादया खोड गोळा करून जाळून टाकने . ५ – स्वयंचालित सौर / इलेक्ट्रीक प्रकाश साफळे प्रति हेक्टर एक ६ – बांधावरील आंबा पेरू एरंडी साग पिकावरही लेप देणे व फवारणी करणे ७ – वर्षातून २ वेळा बहार धरल्यावर व संपल्यानंतर ईमामेक्टीन बेझोएट ५% -२ग्रैम प्रति लिटर प्रमाणे पाण्याची फवारणी . ८ – ईमामेक्टीन बेझोरोट ५% २ ग्रॅम + कॉपर ऑक्लोराईट २ग्रॅम + ४ किलो गेरु + १० लिटर पाणी चे पेस्ट करून मुळे फांद्या खोड यावर लेप देणे . उपाचारत्मक उपाय मध्ये १- ईमामेक्टीन बेझोऐट ५% २ग्रॅम + प्रोपकोनॅझोल १०% २ग्रॅम प्रति लिटर पाणी पहिले ड्रेचिग / आळवणी वयानुसार ५ -१० लि पाणी सह द्यावे २ – या पद्धतीने दुसरी आळवणी १५ .दिवसानी व तिसरी ३० दिवसांनी द्यावी . ३ – -थायमेथोक्झीम २५% २मिली + आझाडीरेक्टीन १० हजार पी.पी.एम ३मिली + २ मिली स्टिकर सह फवारणी करावी . अशा प्रकारे उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाय केले तर नक्कीच खोड किडा पीन होल बोरर ही दशा घालविता येईल म्हणून शेतकरी बंधूनी एकात्मिक किड नियंत्रणाचा वापर करावा !!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभीमराव राजाराम वाघमोडे यांच्यावर आटपाडी पोलीस स्टेशन येथे 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल.
Next articleरत्नाई कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी साजरी केली एक अनोखी धुळवड…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here