डीसीसी बँकेच्या उपळाई खुर्द शाखेच्या वतीने मेघश्री गुंड हिचा विशेष सत्कार

माढा (बारामती झटका)

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 4 थी मधील विद्यार्थ्यांनी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने मंथन वेलफेअर फाउंडेशनने घेतलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यात 6 वा क्रमांक,एटीएस स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात प्रथम, घोषवाक्य स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक, क्षितिज फाउंडेशनने घेतलेल्या पाककृती व पालेभाज्यांची ओळख या स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक तसेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविल्याबद्दल “गुणवंत विद्यार्थीनी” म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपळाई खुर्द शाखेच्या वतीने बँक इन्स्पेक्टर लक्ष्मण चांगभले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक बँकेचे कर्मचारी विनायक जाधव यांनी केले.

यावेळी बँक इन्स्पेक्टर लक्ष्मण चांगभले म्हणाले की,विठ्ठलवाडी हे माढा तालुक्यातील एक छोटे गाव आहे.या गावातील व शाळेतील अनेक विद्यार्थी सातत्याने विविध स्पर्धी परीक्षेत यशस्वी होत आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.गावातील प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगली असून त्याचा फायदा होत असल्याने मेघश्री गुंड या मुलीने विविध स्पर्धा परीक्षेत राज्य व जिल्हा पातळीवर क्रमांक पटकावून गावाचा व शाळेचा नावलौकिक उंचावला असल्याचे  त्यांनी सांगितले.

यावेळी शाखाधिकारी आण्णासाहेब पाटील,सचिव आण्णासाहेब पाटील, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,लिपिक बाबासाहेब आतकरे,कॅशिअर सतीश लोंढे,विनायक जाधव,सहशिक्षिका छाया राऊत,हनुमंत काळे,संतोष कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात वन विभागाला सहकार्य करणारे तरंगफळ गाव आहे: धैर्यशील मोहिते-पाटील
Next articleकार्तिक वारी पूर्ववत करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here